Skip to content
  • Central Gov Yojana
  • State Gov Yojana
  • News
  • Daily Update
  • Krushi Yojana
  • Naukri

Shikshak Bharti शिक्षक होण्याच्या अभ्यासक्रमात मोठा बदल !

by yojnavikas

• शिक्षक होण्याच्या अभ्यासक्रमात मोठा बदल ! काय आहे 2025 चा Shikshak Bharti

Shikshak Bharti शिक्षण क्षेत्रामध्ये रोज काही न काही बदल होत आहे केंद्र सरकारने असच एक मोठा बदल केला आहे. शिक्षक होण्यासाठी या आधी जो अभ्यासक्रम होता यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारची राष्ट्रीय शिक्षण परिषद म्हणजेच (NCTE) या संस्थेने नवीन नियम जरी केले आहे.

 यामध्ये शिक्षक बनण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हटलेची सुधारणा होत आहे. बदललेले नियम हे राज्यांना व विदयापीठ यांना पाठवण्यात आले आहे. यासारख्या बदलमुळे जवळ जवळ 11 वर्षानंतर शिक्षक बनण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठे बदल होणार आहे.

• Shikshak Bharti मुख्य वैशिष्ट्ये – 

1) 1 वर्षाचा जुना बी. एड. अभ्यासक्रम पून्हा सुरु – 

तब्बल 10 वर्षानंतर एक वर्षाचा बी. एड. कार्यक्रम पुन्हा सुरु होणार आहे . हा कार्यक्रम पिजी (P. G.) पदवी उत्तर पदवीधरासाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पदवीउत्तर पदवी पूर्ण केली असणार आहे ते विद्यार्थी एक वर्षाच्या बी. एड. कार्यक्रमात प्रवेश घेऊ शकतात.

 2) 2 वर्षाचा बी. एड. अभ्यासक्रम – 

ज्या विदयार्थ्याने तीन वर्षाची पदवी पूर्ण केलेली आहे ( बॅचलर डिग्री ) अश्या विदयार्थ्यांना दोन वर्षाचा बी. एड. अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम आधीपासूनच आहे पण यामध्ये या अभ्यासक्रमाचा विस्तार केला गेला आहे.

 3) 4 वर्षाचा बी. एड. अभ्यासक्रम –  Shikshak Bharti

12 वी नंतर एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षक बनण्याची इच्छा असेल अश्या विदयार्थ्यांना बी. एड. अभ्यासक्रम आहे. यामध्ये BA-B.ED, BSC-B. ED, आणि B COM -B.ED असे एकत्रित अभ्यासक्रम समाविष्ट आहे. अश्या अभ्यासक्रमांची पहिली बॅच 2023 मधे सुरु करण्यात आली.

 4) काय आहे नवीन स्पेशलायझेशन – 

2025 वर्षमध्ये नवीन B.ED. मधे नवीन स्पेशलायझेशन जोडण्यात येणार आहे.

• शारीरिक शिक्षण 

• कला शिक्षन  Shikshak Bharti

• योग शिक्षण 

• संस्कृत शिक्षण

 5) एम.एड मधे केले गेलेले बदल – 

एम.एड (M.ED) अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात आलेले आहे. आता एम.एड.पूर्णवेळ आणि अर्ध वेळ अश्या दोन्ही प्रकार मधे उपलब्ध केले आहे. Shikshak Bharti

 • का झाले हे बदल ! Shikshak Bharti

हा बदल राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच NEP 2020 च्या शिफारशी करण्यात आला आहे.NEP चा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्ता आणणे हा आहे. तसेच या धोरणामुळे शालेय शिक्षण संपूर्ण पणे 4 टप्प्यामधे विभागले गेले आहे. Shikshak Bharti

• पायाभूत असलेला टप्पा 

• पूर्वतयारी टप्पा 

• मध्यम टप्पा 

• माध्यमिक टप्पा 

शिक्षकांना या चारही टप्प्यामध्ये तयार केले जाणार आहे. नवीन अभ्यास क्रमध्ये AI, व्यवसायिक शिक्षण, आणि इतर गरजेचे असलेल्या अभ्यास क्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे.

 • काय असणार आहेत महाविद्यालय साठी नवीन नियम – Shikshak Bharti

2025 च्या नवीन नियमानुसार जे महाविद्यालये बहिविद्याशाखीय अभ्यासक्रम सुरु करतील त्याच महाविद्यालयांना बी. एड. चा अभ्यासक्रम चालविन्याची परवानगी दिली जाणार आहे. Shikshak Bharti ज्या शिक्षण संस्था नियमांचे पालन करणार नाही त्यांच्याकडील असणारे बी.एड.अभ्यास क्रम बंद केले जाणार आहे यासाठी 4 वर्षाचा कालावधी दिला जाणार आहे.

 • B.ED. New Syllabus यापुढे शिक्षक बनण्यासाठी काय करावे – 

1) जर बारावी नंतर शिक्षक बनण्याची तयारी करत असाल तर चार वर्षाचा एकात्मिक असलेला बी. एड.अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा.

2) जर पदवी झलेली असेल तर दोन वर्षाचा बी.एड.कार्यक्रमात प्रवेश घ्यावा.

3) पदवी उत्तर असाल तर एक वर्षाचा बी.एड.कार्यक्रम मधे प्रवेश घ्यावा.

 शिक्षक बनण्याच्या तयारीला या सारखे बदल अधिक गुणवत्ता पूर्ण आणि सुविधा जनक बनवले जाणार आहे. NEP 2020 च्या मार्फत केले गेलेले बदल हे शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये आणि शिक्षणामध्ये व गुणवत्तेमध्ये बदल करण्यासाठी केले गेले आहे. जर एखादा विद्यार्थी शिक्षक बनण्याची तयारी करत B.ED. New Syllabus असेल तर हा नवीन नियम नवीन विद्यार्थ्याच्या करिअरसाठी उत्तम संधी आहे.

 सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षक हा एक गुरु असतो व आधारस्तंभ असतो या बदलामुळे भारतातील शिक्षण व्यवस्था ही सुविधा जनक आणि मजबूत होणार आहे.नवीन विद्यार्थी जे आता शिक्षक बनण्याची तयारी करत आहेत आता त्यांना सुअर्ण संधी आहे कारण सरकारच्या वेळो वेळी होणारी शिक्षक भरती आणि अभ्यास क्रमामध्ये झालेला बदल याचा नक्कीच फायदा होणार आहे .आधी विद्यार्थ्यांना भरपूर अडचणींना सामना करावा लागत होता परंतु 2020 च्या NEP राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले.

अश्याच नोकरी विषयी नवीन नवीन माहितीसाठी आपण आपला whats app ग्रुप जॉईन करू शकता व नवीन माहिती लगेच आपल्या मोबाईल वर मिळवू शकता.

Tags b ed 1st year syllabus pdf in marathi science, b ed subjects list arts, b.ed 1st year syllabus in english, b.ed 1st year syllabus pdf, b.ed 1st year syllabus pdf in marathi, b.ed first year syllabus in hindi, B.ED., B.ED. New Syllabus, bamu university books pdf free download, pavitra portal login for teacher recruitment, pavitra portal new registration, pavitra portal registration, Shikshak Bharti, shikshak bharti maharashtra, teacher recruitment 2025 maharashtra, TET परीक्षांचे किती प्रकार आहेत, ऑनलाइन नोंदणी फॉर्म म्हणजे काय, ऑनलाइन पोर्टल नोंदणी म्हणजे काय, कोणती शिक्षक परीक्षा सर्वोत्तम आहे, टायट परीक्षेसाठी कोण पात्र आहे, टीईटी परीक्षा कशी उत्तीर्ण व्हावी, टीईटी पात्रता गुण म्हणजे काय, पवित्र पोर्टल महाराष्ट्रात सुरू झाले आहे का, पोर्टलची माहिती काय आहे, फॉर्मची नोंदणी अनिवार्य आहे का, बी. एड., महाराष्ट्रातील सरल पोर्टल काय आहे
अवैध रित्या Donkey Route अमेरिकेमध्ये जाणारे भारतीय : चिंतेचा विषय
Ration Card eKYC Online 2025 आता घरबसल्या करा आपल्या मोबाईल द्वारे

Pages

  • Home
  • Term
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy

Category

  • News
  • Naukri
  • Daily Update
  • Krushi Yojana
  • State Gov Yojana
  • Central Gov Yojana
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Term
  • Disclaimer
Copyright © 2024-25 Yojna Vikas