
Right to Education RTE Admission 2025-26 फॉर्म सुरु.
RTE Admission 2025-26 परिचय
RTE Admission 2025-26 मधे ऍडमिशन घेतले आहे असे तुम्ही खूप वेळा ऐकले असेल आज माहिती करून घेऊ हे नेमकी काय आहे आहे आणि याचे फायदे काय आहे तसेच याद्वारे ऍडमिशन कसे घ्यायचे याची संपूर्ण प्रक्रिया आपण माहिती करून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो नेहमी प्रमाणे आपण yojnavikas.com या वेबसाईट द्वारे सामान्य लोकांना जी माहिती पूर्ण माहिती नाही ती आपल्या सध्या आणि सरळ बजाशेत माहिती करून देण्याचा ठरयत्न करत असतो.
अशीच माहिती आपण आपल्या व्हाट्स ऍप्प वर देखील बघू शकता या साठी तुम्हाला इंस्टग्राम अकॉउंट yojnavikas ला follow कर्जन बायो मधे दिलेल्या लिंक वर क्लीक करून तुम्ही yojnavikas चा व्हाट्स ऍप्प ग्रुप जॉईन करू शकता. चला तर मग बघूया काय आहे RTE द्वारे ऍडमिशन ची प्रक्रिया.
• RTE म्हणजेच Right To Education या योजनेद्वारे लहान मुलांना खाजगी शाळेमध्ये मोफत शिक्षण दिले. नर्सरी, केजी, जुनिअर केजी, अश्या वर्गमध्ये मोफत शिक्षण दिले यात कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही याची सर्व प्रोसेस ही ऑनलाईन पद्धतीने होत असते व एक ठराविक वेळ दिला जातो त्या तारखाच्या आतमध्ये फॉर्म भरून ऍडमिशन केले जाऊ शकते पण यावर्षी म्हणजेच 2025 मधे ही प्रक्रिया लवकर सुरु करण्यात आली आहे.
ही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 14 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 पर्यंत याचे भरता येणार आहेत जर आपल्या संपर्कात किंवा घरामध्ये लहान मुले असतील आणि त्यांना चांगल्या किंवा खाजगी शाळेमध्ये टाकायचे असेल तर या योजनेचा नक्कीच फायदा घ्या आणि आपल्या संपर्कातील मित्रांना किंवा नातेवाईक यांना देखील सांगा.
• ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया आपण हे नंतर बघणार आहोत तत्पूर्वी आपण आज या लेखामध्ये पात्रता काय असणार. याचे फायदे काय आहेत, काय कागदोत्रे लागणार आहेत याची सम्पूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत.
• महाराष्ट्र सरकारचे जे प्राथमिक शिक्षण संचालनालय तर्फे एक 13 जानेवारी 2025 मधे सूचना काढण्यात आलेली आहे यामध्ये ज्या शाळा विना अनुदानित,पोलीस कल्याणकारी शाळा,वंचित घट कातील शाळा, महानगर पालिका शाळा अश्या प्रकारच्या शाळेमध्ये RTE द्वारे 25% प्रवेश ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत.
आता यासाठी जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी महाराष्ट्र सरकार चि वेबसाईट आहे त्या द्वारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता student.maharashtra.gov. in_portal ही ती वेबसाईट आहे ज्या द्वारे तुम्ही अर्ज करू शकता

• वंचित घटकमध्ये कोणत्या कोणत्या प्रवर्गाचा समावेश होतो ते आपण बघू RTE Admission 2025-26 –
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब) भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (O. B. C.), विशेष मागासवर्गीय (एस.बी.सी), आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटक, एच. आय.व्ही बाधित किंवा प्रभावित बालके, अनाथ बालके, दिव्यांग बालके, यासारख्या प्रवर्गाचा यामध्ये समावेश होतो. तसेच पालकांचे उत्पन्न हे जर 1 लाखापेक्षा कमी असेल तर अश्या पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये संवाश होतो.
जर आपल्या बालकाचे ऍडमिशन करायचे असेल तर विचारपूर्वक आपल्या जवळील कोणत्याही 10 शाळेची निवड करावी व फॉर्म भरताना याचा समावेश करावा.जर पालकांनी बालकाचा RTE मधून अर्ज जर केलेला असेल तर तर त्यांना पुन्हा यासाठी अर्ज करता येणार नाही.
आणि पालकांनी फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करायचे नाही. अश्या प्रकारे काही महत्वाचे पॉईंट आहेत आपण नंतरच्या लेखामध्ये हा फॉर्म कसा भरायचा ते सांगणार आहोत.
• आता आपण बघू यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? RTE Admission 2025-26
सर्वात प्रथम हे लक्ष्यात असू द्या की फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे अपलोड करायची नाहीत. ही सर्व कागदपत्रे तुम्हाला शाळेमध्ये जमा करायची असतात.
1) राहत्या ठिकाणचा पूरवा म्हणजेच निवासी पूरावा – 25 % बालचे ऍडमिशन करताना तुम्ही जी शाळ निवडणार आहात त्या शाळेच्या जवळ आपल्या स्वतः च्या मालकीची निवासी व्यवस्था असेल तर या ठिकाणी तुम्हाला आपले ड्रायविंग लायसन्स, मतदान कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, पासपोर्ट, घरपट्टी, राष्ट्रीकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणतेही एक कागदपत्रे द्यावे लागणार आहे.जर यापैकी तुमच्याकडे काही ही नसेल तर तुम्हाला यामध्ये रेंट ऍग्री मेन्ट द्यावे लागणार आहे यामध्ये अग्रीमेंट हे 11 महिन्याचे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचे लागणार आहे.
2) जन्म तारखेचा पूर्वा / जन्म दाखला – ग्रामपंचायत दाखला,रुग्णालयातील दाखला, अंगणवाडी मधील दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एक लागणार आहे.

3) जर पालक आर्थिक दृष्टया प्रवर्गातील असतील – तर यामध्ये पालकांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागणार आहे पालकाचे उत्पन्न हे 1 लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे. उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर यामध्ये पगाराची स्लिप, कंपनीचा दाखला, किंवा मालकाचा दाखला हा ग्राह्य धरला जाणार आहे.
4) जर बालक दिव्यांग असेल – दिव्यांग बालक असेल तर वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असलेले प्रमाणपत्र, जिल्हा शल्य चिकित्सक यापैकी एक कोणतेही प्रमाणपत्र लागणार आहे.
5) सामाजिक वंचित संवर्गातील बालक जर असल्यास आवश्यक असणारे कागदपत्रे – तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल यांनी दिलेला जातीचा दाखला हा द्यावा लागणार द्यावा लागणार आहे. जर पर राज्यातील जातीचा दाखला असेल तर तो चालणार नाही.
6) RTE मधे प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी आणि पालक यांचे आधार कार्ड देणे गरजेचे आहे. यामध्ये जर आधार कार्ड जमा केले नसेल तर तात्पुरता बालकाला प्रवेश दिला जातो.यामध्ये पालकांनी 90 दिवसाच्या आत आधार कार्ड जमा करणे अनिवार्य राहणार आहे.
7) जर बालक अनाथ बालक असेल तर – बालसुधार गृहाची कागदपत्रे, जर एखादा बालक अनाथालयात राहत नसेल तर जे बालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे याठिकाणी हमीपत्र लागेल अनाथ बालकाच्या प्रवेशा वेळी वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही.
8) आवश्यक कागदपत्रे –
1) रहिवाशी पुरावा
2) पाल्ययाचा जन्माचा दाखला
3) पाल्याचे पासपोर्ट साईज फोटो
4) पालकांचा जातीचा दाखला
5) ओपन किंवा ओबीसी जर असेल तर 1 लाखाच्या आत असणारे वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागणार आहे.
• यामध्ये वयाची काय अट असणार आहे ते आपण बघू –
1) प्ले ग्रुप /नर्सरी – यामध्ये वयोमर्यादा ही 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत पाल्याचे वय हे कमीत कमी 3 वर्ष असावे आणि जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिने 30 दिवस
2) जुनियर केजी – वयोमर्यादा ही – 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कमीत कमी पाल्याचे वय हे 4 वर्ष असावे व जास्तीत जास्त वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस असावे
3) सिनियर केजी – 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 मधे कमीत कमी वय हे 5 वर्ष असावे तसेच जास्तीत जास्त वय हे 6 वर्ष 5 महिने 30 दिवस असावे
4) इयत्ता 1 ली – वयोमर्यादा ही 1जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत कमीत कमी 6 वर्ष वय असावे तसेच 7 वर्ष 5 महिने 30 दिवस हे जास्तीत जास्त वय असावे.
अश्या प्रकारे आपण RTE Right to Education यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण सर्व माहिती बघितली आहे यामध्ये आवश्यक कागदत्रे आणि याबद्दलची माहिती बघितली पुढच्या लेखामध्ये आवण ऑनलाईन कसा फॉर्म भरायचा ते बघणार आहोत.
• सतत विचारले जाणारे प्रश्न
1) RTE प्रवेश काय आहे?
RTE म्हणजे Right To Education आहे यामध्ये वंचित सामाजिक प्रवर्गातील मुले, अनाथ मुले, तसेच दिव्यांग मुलांसाठी खाजगी शाळेत मोफत प्रवेश दिला जातील यामध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
2) RTE कोट्याचा अर्थ काय आहे?
प्रत्येक शाळेमध्ये RTE 25% कोटा असतो यामध्ये केजी सिनियर केजी, 1 ली मधे असणाऱ्या मुलांना मोफत शिक्षण दिले जाते शाळेमध्ये RTE कोटा हा 25% असतो.
3) RTE अंतर्गत कोणती शाळा येते?
RTE अंतर्गत आपल्या क्षेत्रातील सर्व शाळा म्हणजेच खाजगी शाळा यामध्ये येतात.
4) RTE म्हणजे काय?
RTE म्हणजे Right to Education या मार्फत मुलांना शाळेमध्ये मोफत ओरवेश दिला जातो.