Subsidy for Purchasing Cows and Buffaloes गायी म्हशीच्या खरेदीसाठी अनुदान योजना

• Purchasing Cows and Buffaloes गायी म्हशीच्या खरेदीसाठी अनुदान योजना – 

Purchasing Cows and Buffaloes नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागातील आहे व त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. सध्याची पारिस्थिती बघता पावसाची अनियमितता यामुळे शेती मधील उत्पादनक्षमता ही मोठ्या प्रमाणात कमी झलेली दिसते.उत्पादन क्षमता कमी असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणींना सामना करतो.

अश्यावेळी सरकारने शेती व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी आपली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी शेतीला जोडून इतर व्यवसायासाठी अनुदान योजना राबवित असते त्यापैकी एक म्हणजे गायी म्हशी घेण्यासाठी अनुदान योजना आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्र सरकार ही गायी म्हशी खरेदी करण्यासाठी म्हशीच्या किंवा गाईच्या प्रकारनुसार अनुदान देते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांनी शेतीला जोडून आपला दूध व्यवसाय सुरु करून आपली आर्थिक अडचण दूर करणे हा आहे. Purchasing Cows and Buffaloes

आज आपण या लेखामध्ये ही योजना काय आहे, या योजनेचे फायदे काय आहे तसेच अर्ज प्रक्रिया काय असणार या सर्व विषयावर चर्चा करणार आहोत. अश्याच महत्वपूर्ण माहिती साठी आपण जर आपल्या yojnavikas इंस्टाग्राम अकॉउंटला follow केले नसेल तर लवकर करून घ्या व आपल्या व्हाट्स ऍप्प ग्रुप ला जॉईन करा चला तर मग बघूया गायी म्हशी अनुदान योजना काय आहे ? याबद्दलची माहिती.

 गायी म्हशी खरेदीसाठी योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये – 

शेतीला जोडधंदा म्हणून सरकार गायी म्हशी खरेदी करण्यासाठी अनुदन देत असते यामध्ये सरकारने काही नियम व अटी लागू केलेल्या आहेत आपण याची देखील बघणार आहोत सर्वात आधी या योजनेकगी वैशिष्ट्ये म्हणजे गायी खरेदि करण्यासाठी सरकार सरासरी 50 हजार पर्यंत अनुदान देते यामध्ये गाया चे प्रकार भरपूर असल्यामुळे वेग वेगळ्या प्रकरातील गायी साठी अनुदान हे ठरलेले आहे.दुग्ध व्यवासायला पुढे नेण्यासाठी सरकारने गायी आणि म्हशी या डॉन जनवरासाठीच ही योजना लागू केलेली आहे. या व्यतिरिक्त म्हशी घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून 60 हजार ते 90 हजार पर्यंत अनुदान मिळते यामध्ये देखील प्रकार असल्यामुळे म्हशीच्या जातीनुसार अनुदान दिले जाते.

 Purchasing Cows and Buffaloes योजनेची पात्रता काय आहे हे आपण माहिती करून घेऊ –

1) या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्ययक आहे पर राज्यातील रहिवाशी या साठी अर्ज करू शकत नाही.अर्ज करण्यासाठी रहिवाशी दाखला किंवा आधार कार्ड वरील असणारा पत्ता ग्राह्य धरला जातो. Purchasing Cows and Buffaloes

2) शेतकरी किंवा पशुपालन मधे आधी पासून अनुभव  – 

महाराष्ट्र सरकार ही शेतकऱ्यांसाठी किंवा पशुपालक व्यवसायमध्ये ज्याला कोणालाही रस असेल त्यासाठी अनुभव असला पाहिजेत असे खी नाही नवीन ज्याला अनुभव नाही तो देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतो 

3) शारीरिक दृष्टया आणि आर्थिक दृष्टया स्थिर असणे –

 ज्या वेळेस अर्जदार हा व्यवसाय सुरु करणार आहे त्यावेळी अर्जदाराकडे जनवारंसाठी गोठा असणे तसेच या व्यतिरिक्त आवश्यक जागा व सुविधा असणे आवश्यक आहे.राष्ट्रीकृत बँक मधे अर्जदाराचे बँक खते असणे आवश्यक आहे. Purchasing Cows and Buffaloes

4) आर्थिक असलेली परिस्थिती – 

अर्जदार हा आर्थिक दृष्ट्या स्थिर असावं अर्ज दराने या पूर्वी अश्या कोणत्याही प्रकारच्या योजनाचा लाभ घेतलेला नसावा.असे आढळून आल्यास अर्ज बाद केला जातो. त्याचप्रमाई अर्जदार हा आर्थिक दृष्ट्या भक्कम असावा व कर्जाची परतफेड करणारा असावा.

5) महिलांसाठी विशेष – 

गायी म्हशी खरेदीसाठी महिला जर अर्जदार असतील किंवा अनुसूचित जाती,जमाती अल्पसंख्याक, दिव्यांग इत्यादी साठी सरकारतर्फे विशेष अनुदान दिले जाते.

6) वयाची असणारी मर्यादा – योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे कमीत कमी 18 वर्ष असावे आणि जास्तीत जास्त अर्जदारचे वय हे जास्तीत जास्त 60 वर्षा पर्यंत असावे.

महाराष्ट्र सरकार तर्फे गायी म्हशी खरेदी करण्यासाठी काही अटी दिलेल्या आहेत त्या आपण खाली बघू – 

सरकारने जे विक्रेते अधिकृत केलेले आहे त्या विक्रेत्याकडूनच गायी म्हशीची खरेदी करावी लागेल. ज्यावेळेस शेतकरी किंवा पशुपालक गायी म्हशीची खरेदी करतील त्याच वेळेस सरकारी अधिकारी गायीची किंवा म्हशीची दुधाळ तपासणी करेल. ज्या वेळेस अर्जदर अर्ज सादर करतील अश्या वेळेस अर्जदारणे सर्व कागदपत्रे ही सादर करणे गरजेचे आहे. यामध्ये काही ही चुकीचे आढळून आल्यास अर्ज बाद केला जातो.

  Purchasing Cows and Buffaloes योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे – 

1) आधार कार्ड झेरॉक्स – आधार कार्ड हे अपडेट केलेले असावे यामध्ये संपूर्ण पत्ता, संपूर्ण जन्मतारीख,तसेच संपूर्ण नाव असणे महत्वाचे आहे.

2) रहिवाशी दाखला – ग्रामपंचायत, तहसीलदार, किंवा जिल्हाधिकारी यांचा रहिवाशी दाखला असणे आवश्यक आहे.

3) जमिनीचा उतारा – जो शेतकरी किंवा अर्जदार अर्ज करणार आहे त्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे कारण या ठिकाणी नावावर असलेली जमीन चा 7/12 झेरॉक्स लागणार आहे.किंवा शेतजमीन जर नसेल तर शेत जमीन भाडे तत्ववर घेतल्याचे अग्रीमेंट याची प्रत्येक या ठिकाणी लागणार आहे.

4) बँक खाते – अर्जदाराचे कोणत्याही राष्ट्रीकृत बँकेमध्ये खते असणे आवशयक आहे या ठिकाणी खातेदाराच्या बँकेच्या पासबुक ची प्रत्येक लागणार आहे.

5) व्यवसायचा आराखडा – 

अर्जदार हा पशुपालन करणार आहे कोणत्या ठिकाणी करणार आहे, बाकीच्या सुविधा काय आहेत तसेच एकूण मोकळी जागा किती आहे या संदर्भातील संपूर्ण आराखडा द्यावा लागणार आहे.

6) उत्पन्नाचा दाखला – अर्जदार यांना तहसीलदार किंवा इतर कोणत्याही शासकीय प्रकारचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागतो 

7) पासपोर्ट फोटो – पासपोर्ट साईज चे फोटो आणि या व्यतिरिक्त पॅन कार्ड आणि मतदान कार्ड लागते.

8) यामागील कर्ज – जर अर्जदाराने या योजनेच्या आधी कर्ज घेतलेले असेल तर त्या कर्जा संदर्भातील असणारे लोन स्टेटमेंट या ठिकाणी लागतात.

9) जातीचा दाखला – जर अर्जदार हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर कोणत्याही प्रवर्गात असतील खुला प्रवर्ग सोडून तर या ठिकाणी जातीचा दाखला लागणार आहे.

10) पशुपालन व्यवसायचे प्रमाणपत्र – अर्जदाराने वपशुपालन या व्यवसायचे प्रशिक्षण घेतलेले असेल तर या ठिकाणी प्रमाणपत्र लागणार आहे हे प्रमाणपत्र इतके काही महत्वाचे नाही.

 • Purchasing Cows and Buffaloes अर्ज करण्याची प्रक्रिया – 

गायी म्हशी खरेदी करण्यासाठी डॉन ओरकरे अर्ज करता येतो एक म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आणि दुसरा म्हणजे ऑफलाईन पद्धतीने सर्वात प्रथम आवण ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करता येईल ते बघू.

1) Purchasing Cows and Buffaloes ऑनलाईन अर्ज – 

• महाराष्ट्र राज्याची  mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईट द्वारे अर्ज करता येतो.

• या ठिकाणी नोंदणी करावी लागते आवश्यक असलेली माहिती संपूर्ण काळजीपूर्वक भरा. या ठिकाणी आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक असणे गरजेचे आहे.

• त्यानंतर आपल्याला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचं आहे तो पर्याय निवडून बाकीची माहिती भरावी 

Purchasing Cows and Buffaloes अर्ज प्रक्रिया –

सर्व माहिती नोंदणी साठी भरल्यानंतर आता अर्ज करावा लागेल यामध्ये अर्ज करताना संपूर्ण नाव, वैक्तिक माहिती, जमिनीची माहिती तसेच व्यवसायचा आराखडा व तसेच लागणारी इतर आवश्यक कागदपत्रे उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, जमिनीचा उतारा, बँकेची माहिती, रशिवाशी दाखला इत्यादी कागदपत्रे अपलोड करावी.

• सर्वात शेवटची प्रक्रिया म्हणजे आता अर्ज सबमिट करणे अर्ज सबमीट करताना आता पण माहिती सर्व योग्य भरली आहे की नाही हे चेक करून घ्यावे अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्ज क्रमांक मिळेल हा अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवल्यानंतर या अर्ज क्रमांकामुळे आपल्या अर्जाची स्थिती आपण चेक करू शकतो.

 • आता आपणा बघू अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने कसा भरता येईल – 

1) गाय म्हशी खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा पशुसंवर्धन कार्यलयातून किंवा पंचायत समिती कार्यलयातून फॉर्म घ्यावा लागतो. फॉर्म वर विचारली गेलेली सर्व माहिती ही काळजीपूर्वक बहरून आवशयक सर्व कागदपत्रे जोडून संपूर्ण भरलेला अर्ज हा जवळाच्या पशु संवर्धन कार्यलयात किंवा पंचायत समिती कार्यालयात हा फॉर्म जमा करावा लागतो त्यानंतर अर्जाची तपासणी केली जाते. अर्ज पडताळणी नंतर अर्जदाराच्या बँक खातायमध्ये गायी म्हशी खरेदी करण्यासाठी निधी ट्रान्सफर केला जातो. Purchasing Cows and Buffaloes

 • गायी म्हशी योजनेचे फायदे – Purchasing Cows and Buffaloes

 1) आर्थिक सहकार्य – गायी म्हशी खरेदी करण्यासाठी आर्थिक सहकार्य सरकारतर्फे दिले जाते  

2) दूध व्यसायला चालना – शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय हा आहे यामुळे शेतकऱ्याची शेती सोबत दूध व्यावसाय मार्फत उत्पन्न मिळते.

3) ग्रामीण क्षेत्राचा विकास – 

अश्या वेग वेगळ्या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक स्थिती सुधारते आणि हळू हळु ग्रामीण भागाचा विकास होतो.

4) रोजगार संधी – दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण भागामध्येबरोज निर्मिती हकते ज्यामुळे बेरोजगरीचे प्रमाण कमी हट जाते. Purchasing Cows and Buffaloes

5) बाजारपेठ – दुग्ध व्यावसायामुळे दुधाचे मोठ्या प्रमाणत उत्पादन होते अश्या वेळी या व्यवसायला जोडून सहकारी दूध संकलन तसेच दूध ओरक्रिया उद्योग दवखील सुरु होऊ शकतात.

6) महिलांना प्राधान्य – या योजनेद्वारे सर्वात प्रथम महिलांना प्राधान्य दिले जाते कारण महिला स्वबळावर स्वतः चा व्यवसाय सुरु करू शकतात आणि कौटुंबिक उत्पन्नाला हातभार लावू शकतात.

सतत विचारले जाणारे प्रश्न 

1) गायी म्हशी खरेदी अनिदान योजनेसाठी कोण पात्र आहे

गायी म्हशी खरेदी साठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजेतसेच अर्जदारकडे पशुपालणासाठी आवश्यक गोठा व तसेच बाकीच्या सुविधा असल्या पाहिजे.या योजनेमध्ये महिला व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांना प्राधान्य दिले जाते.

2) गायी म्हशी घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती

गायी म्हशी अनुदान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी काही लागदपत्रांची आवशयकता असते उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, जमिनीचा उतारा, व्यवसायचा आराखडा, जात प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, उत्पन्नाचा दाखला इत्यादी