
PMAY प्रधानमंत्री आवास योजना 2025 महाराष्ट्रामध्ये 2024 मधे जी विधानसभा निवडणूक झाली आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ परत घेतली आहे आहे. शपथ घेत्ल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या कामाचा धडाका सुरु केला यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील घरकुल योजनेसंदर्भात एक महत्वाचे विधान केले आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये नवे तर भारतामध्ये देखील गरीब कुटुंबाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
वाढत्या लोकसंख्यामुळे उत्पादन क्षमता कमी आणि लोक संख्या जास्त असल्यामुळे ही सर्व अडचण तयार झालेली आपणास दिसते अश्या वेळी गरीब कुटुंबातील लोकांसाठी प्रत्येक वेळी विशेष लक्ष देऊन सरकार योजना आणत असते त्यापैकी घरकुल योजना ही एक त्यांत महत्त्वाची योजना आहे.माणसाचे मुलभूत गरजा मध्ये अन्न,वस्र,निवारा या आपण लहानपनापासून ऐकत आहोत त्यामुळेच या मुलभूत गरजेपैकी निवारा ही खूप महत्त्वाची असणारी गरज आहे .मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राला एकूण 20 लाख घरे मंजूर झालेली आहे
यामध्ये आपण जर बघिले तर नवीन घर्मध्ये 13 लाख 29 हजार 678 घरे यामध्ये मागील घरे 6 लाख 37 हजार 89 घरांचा विस्तार होणार आहे म्हणजेच एका वर्षामध्ये 19 लाख 66 हजार 767 घरे एवडी मंजूर करण्यात आलेली आहे .जर तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला या लेख मध्ये याची संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहोत.
PMAY प्रधानमंत्री आवास योजना 2025 प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना आहे, ज्याचा उद्देश देशातील गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि मध्यमवर्गीय सामान्य लोकांना परवडणाऱ्या कमी किंमतीमध्ये घरे उपलब्ध करून देणे आहे. 25 जून 2015 रोजी ही योजना केंद्र सरकारने सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून सर्व सामन्यासाठी घर या ध्येयाला 2022 पर्यंत साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.PM योजनेला या आधी इंदिरा आवास योजना (IAY) या नावाने ओळखले जात होते जी १९८५ ला सुरु केली होती २०१५ रोजी या योजनेचे नाव बदलून (PMAY) प्रधानमंत्री आवास योजना असे करण्यात आले.
PMAY प्रधानमंत्री आवास योजना 2025प्रधानमंत्री आवास योजनेची प्रमुख उद्दिष्टे :
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे2022 पर्यंत सर्व नागरिकांना घर सुविधा उपलब्ध करून देणे हे होते . शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते.तसेच अनुसूचित जाती जमाती मधील वर्गांना,महिलांना व वंचित वर्गांना या योजनेच्या माध्यमातून मदत केली जाते., शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या स्वत:च्या घराचे स्वप्न साकार करता येते.या योजनेच्या माध्यमातून पर्यावरनाची विशेष काळजी घेतली जाते ज्यामुळे उर्जा वाचते व टिकाऊ घरे तयार होतात.
PMAY प्रधानमंत्री आवास योजना 2025 चे महत्वाचे घटक :
प्रधानमंत्री आवास योजनेचे दोन प्रमुख विभाग आहेत:
- PMAY प्रधानमंत्री आवास योजना 2025 – शहरी (PMAY-U)
शहरी भागातील लोकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. शहरी गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), कमी उत्पन्न (LIG), आणि मध्यम उत्पन्न (MIG) या वर्गांना लक्षात घेऊन घर खरेदीसाठी अनुदान आणि सवलती उपलब्ध करून दिल्या जातात. - PMAY प्रधानमंत्री आवास योजना 2025 – ग्रामीण (PMAY-G)
ही योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी लागू केली जाते. यात मुख्य करून गरिबांना घरे बांधण्यासाठी किंवा जुने घर दुरुस्त करण्यासाठी अनुदान दिले जाते.
शहरी (PMAY-U) काय आहे ? प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना शहरी या मध्ये केंद्र शासनाणे ९ राज्यात ३५ अशी शहरे निवडण्यात आली ज्यामधील गरिबांना या योजनेंतर्गत घरे बांधून दिली जातात.
ग्रामीण काय आहे ? प्रधानमंत्री आवास योजना
ही नावाप्रमाणेच ग्रामीण भागातील लोकांसाठी असून २०२४ पर्यंत १ कोटी कुटूबापर्यंत पोहचणे या योजनेचे तत्काळ उद्दिष्ट आहे.ही १ एप्रिल २०१६ रोजी ग्रामीण भागासाठी सुरु करण्यात आली.भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचा उपक्रम असून हा गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या द्वारे लागू केला जातो.
PMAY प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (EWS) आणि कमी उत्पन्न असणारयाना (LIG) घर खरेदीसाठी घर कर्जावर व्याज अनुदान दिले जाते. व्याज सवलत म्हणजे कर्जदाराला घर कर्ज घेतल्यावर कमी दराने व्याज भरण्याची सवलत मिळते. याशिवाय, मध्यम उत्पन्न गटातील लोकांनाही काही प्रमाणात सवलतीचा लाभ मिळतो.
PMAY अंतर्गत गृहकर्ज व्याज दराच्या अनुदानाचे विभागणी खालीलप्रमाणे आहे:
- (EWS) म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणारे आणि कमी उत्पन्न असणारे (LIG) यांना व्याजामध्ये सवलत ही 6.5% असते
- मध्यम प्रकारचे -1 (MIG-1) यांना व्याजामध्ये सवलत ही 4% असते
- मध्यम प्रकारचे -2 (MIG-2) यांना व्याजामध्ये सवलत ही 3% असते
PMAY प्रधानमंत्री आवास योजचे केंद्र आणि राज्याचे एकमेकांशी असलेले निधीचे प्रमाण :
प्रधानमंत्री आवास योजनेतील निधीचे प्रमाण ६०/४० आहे .या योजने अंतर्गत साध्य करावयायाच्या लाक्षापैकी ६०%अनुसूचित जाती /जमाती ,इतर २५% आणि अल्पसंख्यांक १५% यांना वितरीत केले आहे .एकूण उद्दिष्टाच्या 5% अपंग यांच्यासाठी आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्रता व निकष :-
प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे :
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS): या गटामध्ये वार्षिक उत्पन्न ₹3 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे.
- कमी उत्पन्न गट (LIG): या गटासाठी वार्षिक उत्पन्न ₹3 ते ₹6 लाखांदरम्यान असावे.
- मध्यम प्रकारचे गट -1 (MIG-1): या गटासाठी वार्षिक उत्पन्न ₹6 ते ₹12 लाखांपर्यंत असावे.
- मध्यम प्रकारचे गट -2 (MIG-2): या गटासाठी वार्षिक उत्पन्न ₹12 ते ₹18 लाखांपर्यंत असावे.
PMAY प्रधानमंत्री आवास योजनाच्या अंतर्गत येणारया प्रक्रिया
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे आहे. अर्जदाराला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज सादर करता येतो. अर्ज करण्यासाठी आधार कार्डची माहिती आवश्यक असते. त्याचबरोबर, कागदपत्रांच्या सत्यतेची तपासणी करून, संबंधित कर्ज देणारी बँक किंवा वित्तीय संस्था अर्ज मंजूर करते.

प्रधानमंत्री आवास योजनेचे फायदे :
प्रधानमंत्री आवास योजनेचा मुख्य फायदा म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना कमी किमतीत घर उपलब्ध होणे. योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानामुळे गृहकर्जाचे मासिक हप्ते कमी होतात, ज्यामुळे लोकांना घर खरेदी करणे सोपे जाते. या योजनेचा लाभ घेऊन अनेक कुटुंबांनी आपले स्वतःचे घर बांधले आहे.प्रधान मंत्री आवास योजनेमध्ये सपाट क्षेत्र साठी प्रतीयुनिट 120,000 आर्थिक सह्हाय आणि डोंगराळ भाग ,अवघड क्षेत्रासाठी १३०,००० ची आर्थिक मदत अनुदाणासाठी पात्र कमाल मुळ रक्कम २,००००० रुपये आहे.
PMAY योजनेत झालेले बदल खालील प्रमाणे :
प्रधानमंत्री आवास योजनेत वेळोवेळी काही बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला ही योजना केवळ गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होती, परंतु नंतर त्यात मध्यम उत्पन्न गटालाही समाविष्ट करण्यात आले. तसेच, शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये वेगवेगळ्या अटी आणि अनुदानाच्या सवलती लागू करण्यात आल्या.
PMAY योजना संपादनाची स्थिती :
सप्टेंबर 2023 पर्यंत, PMAY-U अंतर्गत 1.2 कोटी घरे मंजूर करण्यात आली आहेत, ज्यापैकी 74 लाख घरे पूर्ण होऊन लाभार्थ्यांना हस्तांतरित केली गेली आहेत. ग्रामीण भागातील PMAY-G अंतर्गत 2.7 कोटी घरांच्या बांधकामाचे उद्दिष्ट आहे, आणि आतापर्यंत 1.9 कोटी घरे पूर्ण झाली आहेत.
PMAY योजना यशस्वी होण्याचे कारण :
प्रधानमंत्री आवास योजना यशस्वी होण्याची मुख्य कारण म्हणजे अनुदानात दीली गेलेली सवलत . तसेच, राज्य सरकारे आणि स्थानिक प्रशासनांनीही योजनेच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध करण्यात आलेले परवडणारे घरे आणि कर्जावरील व्याज सवलत यामुळे ही योजना यशस्वी ठरली आहे.
PMAY प्रधानमंत्री आवास योजना 2025 निष्कर्ष
प्रधानमंत्री आवास योजना ही देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घराचा प्रश्न सोडवण्यासाठी एक महत्वपूर्ण योजना आहे. 2022 पर्यंत सर्वांसाठी घर हे उद्दिष्ट असले तरी अजूनही काही कामे पूर्ण होणे बाकी आहे. योजनेतून अनेक नागरिकांनी आपले घराचे स्वप्न साकार केले आहे, आणि सरकारच्या या उपक्रमाने लोकांच्या जीवनात खूप मोठा बदल घडवला आहे.
• सतत विचारले जाणारे प्रश्न
1) प्रधानमंत्री मंत्री आवास योजना 2024 चे फॉर्म कधी पर्यंत भरता येतील?
– प्रधानमंत्री आवास योजनेचे फॉर्म सतत चालू असतात त्यामुळे अधिकृत वेबसाईट वेळोवेळी तपासली पाहिजे येतील.
2) प्रधानमंत्री आवास योजनेमर्फत किती कर्ज मिळू शकते?
• ही सबसिडी 20 वर्षाच्या कालावधीसाठी 6 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जाच्या रकमेपर्यंत किंवा कर्जाच्या कालावधी दरम्यान यापैकी जे कमी असेल ते 6.5 % दराने उपलब्ध आहे. सबसिडी फक्त 6 लाख रुपयापर्यंतच उपलब्ध आहे.
3) 2025 मधे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत किती पैसे मिळतात?
• या योजनेमार्फत चांगले घर नसलेल्या लोकांना 120,000 हजार पर्यंत आर्थिक मदत केली जाते.ही रक्कम त्यांना 3 सोप्या हफ्त्यामध्ये दिली जाते.प्रधानमंत्री आवास योजनेचा मुख्य उद्देश दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाजवळ आपले स्वतःचे घर असावे.
4) प्रधानमंत्री आवास योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा?
• 1) PMAY वेबसाईट चे लॉगिन पेज
2) प्रधान मंत्री आवास योजनेच्या वेबसाईट वर फॉर्म भरण्यासाठी श्रेणी सिलेक्ट करा
3) फॉर्म भरण्यासाठी PMAY वेबसाईट वर ओळख सत्यपित करा
4) बी फॉरमॅट मधे तपशील भरा
5) अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कॅपचा प्रविष्ट करा.