
Marriage Certificate विवाह नोंदणी प्रमाणपत्र आता आपण ऑनलाईन प्रमाणपत्र काढू शकतो. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नाने आता डिजिटल सर्वच गोष्टी झालेल्या आहे.परंतु तरी देखील आपल्याला सर्वच गोष्टी माहिती नाही जे आपण घरी बसल्या काढू शकतो.आपण एवढे सरळ सोपे काम एखाद्या एजन्ट मार्फत करायला जातो जे काम अवघ्या 23 रुपयात होण्यासारखे आहे तेच काम आपण 1000 रुपये देऊन करून घेतो.या लेखामध्ये अश्याच गोष्टींची माहिती देणार आहोत जे आपण घर बसल्या करू शकतो. सध्या लीगल कागदपत्रे असल्याशिवाय कोणतेही काम होत नाही त्यातल्या त्यात सध्या लग्न मोठ्या थाटामाटात होते पण विवाह नोंदणी साठी कोणीही सिरीयस घेत नाही लग्न झाल्यानंतर विवाह नोंदणी करणे खूप गरजेचे आहे. अश्या प्रकारे आपण खूप काही सुविधाचा लाभ घेऊ शकतो.
• Marriage Certificate विवाह नोंदणी कशी करावी
विवाह नोंदणी ही आपण दोन प्रकारे करू शकतो.एक ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने. अश्या प्रकारे आपण विवाह नोंदणी करू शकतो. लग्न झाल्यानंतर मुलीचे नाव आधार कार्ड वर नवीन नावाने बनवावे लागते यासाठी विवाह नोंदणी असणे खूप गरजेचे असते पण असे होत नाही लग्न झाल्यानंतर यावर लक्ष्य दिले जात नाही. सरकारच्या नवीन नियमानुसार आता कायद्याप्रमाणे सर्व कागदपत्रे असणे आवशयक आहे.
•Marriage Certificate विवाह नोंदणी प्रमाणपत्राचे फायदे
विवाह नोंदणी केल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड वरील नाव बदलणे आहे. त्यासाठी आधी आपल्याला विवाह नोंदणी करणे आवशयक असते. आधार कार्ड वर नाव बदलण्यासाठी सर्वात आधी मतदान कार्ड बनवणे महत्वाचे कारण मतदान कार्ड नुसारच आधार कार्ड वर नाव बदलण्याची प्रक्रिया आहे. आणि नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी विवाह नोंदणी असणे गरजेचे आहे. म्हणजे या सर्व बाबीमध्ये सर्वात आधी विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. चला तर बघूया विवाह नोंदणी करण्याची संपूर्ण प्रक्रिया.Marriage Certificate
• विवाह नोंदणी साठी दोन प्रक्रिया आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईन सर्वात आधी आपण ऑफलाईन प्रक्रिया बघू आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे याची संपूर्ण घेऊ.
• विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑफलाईन कसे काढावे?
विवाह नोंदणी करताना मुलीकडील ज्या गावामध्ये किंवा राहत्या ठिकाणी त्या भागामध्ये सरकारी हॉस्पिटल असते. त्या सरकारी हॉस्पिटल मधे विवाह नोंदणी साठी एक विवाह नोंदणीचा विभाग असतो तिथे गेल्यानांतर अर्ज भरून आपण विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढू शकतो.
• Marriage Certificate विवाह नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करताना लागणारी कागदपत्रे.
1) Marriage Certificate विवाह नोंदणी करताना मुलीच्या राहत्या भागातील सरकारी हॉस्पिटल मधे याची नोंदणी करावी लागते.
2) यासाठी ज्याने लग्न लावलेले आहे त्यांचे आधार कार्ड झेरॉक्स, पण कार्ड झेरॉक्स, मतदान कार्ड झेरॉक्स आणि 2 पासपोर्ट साईज फोटो पाहिजेत
3) विवाह नोंदणी ला जाताना सर्वात प्रथम ज्याने लग्न लावले आहे तो व्यक्ती,नवरदेव, नवरी तसेच मुलीकडील दोन साक्षीदार, मुलाकडील दोन साक्षीदार अश्या प्रकारे समक्ष समोर लागतात.Marriage Certificate
3) नवरदेवाची कागदपत्रे – आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, मतदान कार्ड झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स, जन्माचा दाखला झेरॉक्स, राशन कार्ड झेरॉक्स आणि 5 पासपोर्ट फोटो लागतात
4) नवरीचे कागदपत्रे – आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स,शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स, जन्माचा दाखला झेरॉक्स, मतदान कार्ड झेरॉक्स, राशन कार्ड झेरॉक्स आणि 5 पासपोर्ट फोटो लागतात.
5) मुलीकडील आणि मुलाकडील जे साक्षीदार समोर असणार आहेत त्यांची कागदपत्रे – आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, मतदान कार्ड झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स,पासपोर्ट साईज फोटो 3
अश्या प्रकारे आवश्यक कागदपत्रे आहे. ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यासाठी जाताना आपण जे झेरॉक्स देणार आहोत त्यांच्यासोबत ओरिजनल कागदपत्रे देखील दाखवावी लागतात. यामुळे हा लेख काळजीपूर्वक वाचून यानुसार प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
6) offline विवाह नोंदणी करताना वरती दिल्या प्रमाणे सर्व जन उपस्थित राहून लग्नाची ओरीजनल प्रत म्हणजेच लग्नाचा फोटो देणे आवश्यक आहे .
• घरबसल्या कसे काढता येईल विवाह नोंदणी प्रमाणपत्र
Marriage Certificate आपण आत्ताच ऑफलाईन पद्धतीने विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढावे हे बघितले आता आपण ऑनलाईन पद्धतीने कसे काढायचे याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊ. यामध्ये जे लॉक गावामध्ये राहतात किंवा ज्या गावामध्ये ग्रामपंचायत आहे अश्या ठिकाणी विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढणे अवघड जाते अश्या वेळी महाराष्ट्र सरकारने आपल्याला आपले सरकार म्हणजे aaplesarkar.mahaonline.gov.in हे ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे जेणेकरून सामान्य माणसाला अश्या कोणत्याही प्रकरच्या अडचणीवर समाधान निघू शकेल. चला तर मग बघूया आपले सरकार पोर्टल चा कसा वापर करून विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढता येईल.
1)सर्वात प्रथम aaplesarkar.mahaonline.gov.in या महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जावे.
2) अधिकृत वेबसाईट वर गेल्यानंतर जार आओले आधीपासूनच अकॉउंट असेल तर usernem आणि पासवर्ड गकून log ईन करून घ्या जार अकॉउंट नसेल तर आपले सरकार पोर्टलच्या उजव्या बाजूला निल्या रंगामध्ये एक New User Ragistre Here असे लिहिलेले असेल या ठिकाणी क्लिक करा. Marriage Certificate
3) New User च्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑपशन 1 आणि ऑपशन 2 असे दोन पर्याय येतील यामध्ये निळ्या रंगमध्ये ऑपशन 1 असेल यावर क्लिक करून खाली जिल्हा निवडण्यासाठी पर्याय येईल
3) जिल्हा निवडल्यांनतर त्यापुढे मोबाईल नंबर टाकण्याचा पर्याय येईल मोबाईल नंबर टाकून otp सेंड करा
4) आपल्या मोबाईल नंबर otp येईल तो टाकुन घ्या Marriage Certificate
5) त्यांनतर username तयार करावा लागेल चेक करून username तयार करा.
6) username तयार केल्यानंतर नवीन पासवर्ड तयार करा आपले पूर्ण टाकून घ्या जन्म तारीख आणि वय टाका आणि खाली रजिस्टर रजिस्टर म्हणून क्लिक करा.
7) रजिस्ट्रेशन झाल्यानतर होम पेज वर या त्यांनतर log in बटनवर क्लिक करा आणि जे तुम्ही username आणि पासवर्ड तयार केला होता तो येथे टाकून log in करून घ्या
Log in झाल्यानतर भाषा बदलून घ्या मराठी भाषा निवडा. पेजच्या डाव्या बाजूला निळ्या रंगामध्ये भरपूर पर्याय येतील यामध्ये ग्रामविकास व पंचायत राज विभाग पर्याय निवडा त्यांनतर येथे आल्यानंतर विवाह नोंदणी दाखला असे पर्याय येईल या पर्यायावर क्लीक करा.परत एकदा पर्याय येतील त्यामध्ये आपल्याला विवाह नोंद दाखला या पर्याया वर क्लिक करून घ्या. पुढे आपल्या समोर अर्जदारची माहिती येईल ती संपूर्ण पणे व काळजीपूर्वक वाचून भरा. माहिती भरल्यानंन्तर समावेश करा या बटणावर क्लिक करा.त्यांनतर लाल रंगामध्ये आपल्यासमोर ok नावाचा पर्याय येईल त्यावर आपल्या अर्ज क्रमांक येईल तो आपल्या कडे काळजीपूर्वक सेव करून घ्या. आणि ok बटनवर क्लिक करा.

Ok बटनवर क्लिक केल्यानंन्तर पुढे आपल्याला फोटो अपलोड करावा लागेल फोटो हा 5 केबि ते 20 केबि आणि फोटोची रुंदी 160 पिकसेल व उंची 200 ते 212 पिकसेल असावी. या साईज मधे फोटो असावा अन्यथा फोटो अपलोड होणार नाही. फोटो अपलोड केल्यानंन्तर खाली पत्नीचा फोटो अपलोड करावा लागेल खाली spouse नावाने पर्याय येईल या ठिकाणी पत्नीचा फोटो अपलोड करायचा आहे. सर्वात खाली अपलोड document नावाने पर्याय येईल येथे क्लिक करून घ्या.Marriage Certificate
अश्याप्रकारे आपण विवाह नोंदणी दाखला घर बसल्या काढू शकतो संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला अर्ज वेरिफिकेशन होऊन दाखला मिळेल.ही online प्प्रक्रिया आपण फक्त 5 वेळा अर्ज करू शकतो त्यांनतर अर्ज करता येत नाही.विवाह नोंदणीची प्रक्रिया अर्ज केल्यानंतर ग्रामसेवक ,असिसटनट ब्लोक डेवलपमेंट ऑफिसर आणि त्यानंतर डेवलपमेंट ऑफिसर अश्या प्रकारे यांनी वेरीकेशन केल्यानंतर आपल्या विवाह नोंदणी दाखला मिळतो.Marriage Certificate

ही ऑनलाईन प्रक्रिया ही ग्राम लेव्हल ला असून शहरी ठिकाणी विवाह नोंदणी दाखला आपल्या ला ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच वर दिलेल्या ऑफलाईन पद्धतीने काढता येईल. Marriage Certificate अधिक माहितीसाठी आपण आपले सरकार च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन बघू शकता अश्याच उपयोगी माहितीसाठी आमच्या इन्स्टाग्राम अकॉउंट yojnavikas याला follow करा आणि व्हाट्स ऍप्प ग्रुप ला जॉईन व्हा.विवाह नोंदणी प्रमाणपत्र आपण फक्त ग्रामीण भागातील रहिवासी ज्यांचे मतदान कार्ड किंवा आधार कार्ड वरील पत्ता गावाकडचा असेल असेच लोक online पध्त्नीने विवाह नोंदणी दाखला काढू शकतात.Marriage Certificate
• सतत विचारले जाणारे प्रश्न
1) विवाह नोंदणी आपण ऑनलाईन करू शकतो का?
हो आपण विवाह नोंदणी aaplesarkar.mahaonline. gov.In या वेबसाईट द्वारे काढू शकतो.
2) विवाह नोंदणी फी किती आहे?
ऑनलाईन विवाह नोंदणी दाखल्याची फी फक्त 23 रुपये आहे.
3) विवाह नोंदणी प्रमाणपत्र कसे काढावे?
विवाह नोंदणी प्रमाणपत्र आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने काढू शकतो ऑनलाईन साठी आपन aaplesarkar.mahaonline. gov.in या वेबसाईट द्वारे काढू शकतो आणि ऑफलाईन आपण जवळच्या सरकारी हॉस्पिटल मधे जाऊन काढू शकतो.
4) विवाह प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे काय आहेत?
विवाह प्रमाणपत्रासाठी वधु आणि वर यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, राशन कार्ड, तसेच लग्नाची पत्रिका, व पासपोर्ट साईज फोटो आवशयक आहे याच बरोबर लग्न लावनाऱ्याचे आधार कार्ड, मतदान कार्ड आणि पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे. तसेच साक्षीदारांचे आधार कार्ड, मतदान कार्ड आणि पासपोर्ट फोटो देखील आवश्यक आहे.
5) विवाह नोंदणी ग्रामपंचायत मधे कशी करावी?
विवाह नोंदणी ग्रामपंचायत मधे करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने aaplesarkar.mahaonline. gov.in या अधिकृत वेबसाईट द्वारे काढू शकतो.
6) विवाह नोंदणी फॉर्म महाराष्ट्र कोठे मिळतो ?
विवाह नोंदणी फॉर्म महाराष्ट्र हा फॉर्म aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईट वर मिळतो.
7) विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत pdf कोठे मिळते ?
विवाह नोंदणी फॉर्म नमुना ग्रामपंचायत pdf ही mygrampanchayt.com या अधिकृत वेबसाईट वर मिळेल .
8) विवाह नोंदणी करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया काय आहे ?
विवाह नोंदणी करण्यासाठी किंवा विवाह नोंदणी दाखला काढण्यसाठी yojnavikas.com वर सविस्तर माहिती दिलेली आहे.