
E-Shram Card ई श्रम कार्ड कसे काढावे ? त्याचे फायदे काय ?
E-Shram Card नमस्कार मित्रांनो नवीन एका योजने मध्ये आपल मनःपूर्वक स्वागत आहे सर्वच ठिकाणी अशी चर्चा आहे की ई श्रम कार्ड द्वारे तीन हजार रुपये मिळतात.आता जर तुम्हाला तीन हजार रुपये मिळावे व तीन हजार रुपये मिळण्यासाठी काय करावे ऑनलाईन अर्ज आहे कि ऑफलाइन अर्ज आहे हे तीन हजार रुपये शासन तुमच्या खात्यामध्ये कशाप्रकारे जमा करणार आहे याविषयीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे बघणार आहोत. अशी नवीन माहिती बघण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम अकॉउंट ला फॉलो करा आणि व्हाट्स ऍप्प ग्रुप ला ऍड व्हा. चला तर मग सुरुवात करूया ई श्रम कार्ड बद्दलची सविस्तर माहिती कशी आहे.ई श्रम कार्ड कसे काढावे ? त्याचे फायदे काय ? E-Shram Card
E-Shram Card च्या माध्यमातून 3000 रुपये तुमच्या बँक खाते मध्ये जमा होत आहे किंवा जमा होणार आहेत अशी चर्चा जी लोक करतात त्यांच्यासाठी हा लेख अतिशय महत्त्वाचा आहे आम्हाला व्हाट्सअप च्या माध्यमातून आणि instagram च्या माध्यमातून अनेक लोकांनी प्रश्न विचारला की आमच्या बँक खात्यामध्ये इ श्रम कार्ड चे पैसे जमा झाले नाहीत कारण अशी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा आहे की हजार रुपये बँक खाते मध्ये सुरू आहे ई श्रम कार्ड योजना नेमकी काय आहे हे समजून घेणे खूप गरजेचे आहे मार्केटमध्ये योजनांचा पाऊस पडतोय अशी चर्चा जरी आपण केली किंवा असं जरी बोललं तरी काही हरकत नाही परंतु सरसगट सर्वच योजना तुम्हाला पैसे हे तितकेच सत्य नाही केंद्र सरकारने ही ई श्रम कार्ड योजना सुरु का केली कशासाठी केली कोणत्या
उद्देशाने केली ही सर्व माहिती आपण बघू. ई श्रम कार्ड हे असंघटित क्षेत्रासाठी आहे. असंघटित क्षेत्रामध्ये बांधकामगार रिक्षाचालक,हात गाडीवाले,छोटे व्यापारी,घरगुती काम करणारे,कृषी कामगार,मजुराने अन्य फ्रीलान्स कामगार इत्यादी कामगार म्हणजे हे असंघटित क्षेत्र आहे. तुमचं वय 16 ते 59 वर्षे या वयाच्या मध्ये असेल तर तुम्ही ई श्रम कार्ड साठी अर्ज करू शकता.
•E-Shram Card योजना कधी सुरु झाली ?
E-Shram Card योजना ही भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय द्वारे 26 ऑगस्ट 2021 रोजी संपूर्ण भारतामध्ये सुरु करण्यात आली. असंघटीत कामगारांची नोंदणी कर्ज त्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली.
•सरकारचे प्रयत्न –
भारत सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आणिक योजना आणल्या, प्रधानमंत्री मानधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, या सारख्या अनेक योजना सरकारने सुरु केल्या पन या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहचण्यासाठी कठीण होत होते कारण त्यांची योग्य माहिती व नोंदणी उपलब्ध होत नव्हती.
•ई श्रम कार्डचे महत्व –
भारतामध्ये असंघटीत कामगार वर्गांची संख्या ही भरपूर मोठी आहे म्हणजेच हे आर्थिक दृष्ट्या भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे या वर्गातील लोकांनी लोकांना सामाजिक सुरक्षा आर्थिक लाभ यांचे हक्क मिळत नाही अशा संघटित वर्गातील श्रमिकांना एकत्र करण्याचे काम भारत सरकारने केला आहे त्याचं मुख्य हेतू म्हणजे अपघात सुरक्षा विमा, सामाजिक सुरक्षा, रोजगार संधी आणि अन्य लाभ योजनांचा फायदा मिळवून देने हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
•E-Shram Card चे फायदे –
या ई श्रम कार्डच्या माध्यमातून असंघटीत कामगारांना सरकारच्या विविध योजनाचा फायदा घेता येतो.
1) विविध योजनाचा लाभ – राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मार्फत येणाऱ्या विविध योजनाचा लाभ या कार्ड द्वारे घेता येतो.ई श्रम कार्ड कसे काढावे ? त्याचे फायदे काय ? E-Shram Card
2) अपघाती विमा – ई श्रम कार्ड ज्या श्रम धारकांकडे आहे सरकार त्यांना अपघाती विमा म्हणजेच 2 लाख रुपयांपर्यंत मदत मिळते. तसेच अपघातामुळे अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास ई श्रम कार्ड हे कुटुंबासाठी मोठा आधार ठरतो.
3) सामाजिक सुरक्षा – जसे सरकारी कामगारांना वृद्धात्वात सरकार पेन्शन सुविधा उपलब्ध करून देते त्याच प्रमाणे ई श्रम कार्ड धारकांना पेन्शन सुविधा, आरोग्य सुविधा, व इतर सामाजिक सुरक्षा सुविधा उपलब्ध होते.
4) प्रशिक्षण योजना – सरकार कौशल्य वाढविण्यासाठी विविध कौशिल्य कार्यक्रमांचे आयोजन करते या कार्यक्रमातून कार्ड धारकांना आपले कौशल्य वाढविण्यासाठी व अधिक प्रमाणात रोजगारची संधी उपलब्ध करून देन्याचे प्रयत्न करते.

5) राष्ट्रीय स्तरावरील डेटाबेस –
या कार्डद्वारे कामगारांचा संपूर्ण एक डेटा बेस तयार केला जातो जेणेकरून त्यांच्या गरजा व येणाऱ्या अडचणी लक्ष्यात घेऊन त्यांच्यासाठी विविध योजना राबविल्या जातात.
ई श्रम कार्ड साठी कोण अर्ज करू शकतो : ई श्रम कार्ड कसे काढावे ? त्याचे फायदे काय ? E-Shram Card
- असंघटीत कामगार – घरातील काम करणारे ,शेतीमधील मजूर ,बांधकाम मजूर,डीलीवरीबॉय ,फेरीवाले, हातगाडीवाले इत्याती
- ई श्रम कार्ड काढण्यासाठी कमीत कमी वय १६ असावे व जास्तीत जास्त वय ५९ वर्ष असावे
- कार्ड काढण्यासाठी कामगार हा आयकर दाता नसावा.
- EPIFO आणि ESIC सदस्य नसावा म्हणजेच अर्जदार कोणत्याही कर्मचारी भविष्य निधी संघटना किंवा कर्मचारी राज्य विमा निगम यांचा सदस्य नसावा.
ई श्रम कार्ड कसे बनवावे यासाठी संपूर्ण प्रक्रिया खाली दिली आहे
1) eshram.gov.In ही कार्ड बनवण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट आहे साईट वर गेल्यानंतर नोंदणी चा पर्या्यावर क्लिक करा.
2) नोंदणी साठी तुमचा आधार क्रमांक भरा.
3) आफहार क्रमांक भारल्यांनंन्तर तुम्हाला otp येईल otp भरून तुमच्या आधार कार्ड शी संबंधित माहिती येईल.
4) इतर माहिती पोर्टल मधे विचारली जाईल त्यामध्ये आपला व्यवसाय, शैक्षणिक पात्रता, बँक खाते यासंबधीची माहिती भरा.
5) सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घेतल्यानंन्तर सबमिट बटन येईल त्यावर क्लिक करून अर्ज सबमिट करा.
6) सबमिट बटणावर क्लिक केल्यानंन्तर तुम्हाला युनिक आयडेंटी नंबर (UAN)मिळेल जो डाउनलोड करून घ्या हाच क्रमांक आपला ई श्रम कार्ड असेल.
•E-Shram Card काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) आधार कार्ड्शी लिंक असलेला मोबाईल नंबर
3) राष्ट्रीकृत बँकेचे पासबुक
4) पासपोर्ट साईज फोटो
•ई श्रम कार्डचे वैशिष्ट
ई श्रम कार्ड ही फायदेशीर असली तरी देखील या योजनेसमोर मोठ्याप्रमाणात आव्हाने आहेत
1) ग्रामीण भागात माहितीचा अभाव – अजूनही ग्रामीण भागातील कामगारांना या योजनेबद्दल योग्य आणि सविस्तर माहिती नाही
2) ऑनलाईन पद्धतिच्या साक्षरतेची कमी – असंघटित कामगार हे कमी शिकलेले असल्यामुळे व डिजिटल साक्षर नसल्यामुळे ई श्रम पोर्टल वापरण्यात अडचण येते
3) कमगाराचा डेटा अपडेट – कामगारांच्या माहिती मधे डेटा अपडेट होन्याची समस्या ज्यामुळे लाभ मिळण्यासाठी विलंब होतो
निष्कर्ष – ई श्रम कार्ड ही सरकारची महत्वकांकशी योजना आहे या योजनेमुळे असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा, आणि सरकारी योजणांचा लाभ थेट मिळण्याची संधी आहे.ई श्रम कार्ड कसे काढावे ? त्याचे फायदे काय ? E-Shram Card

ई श्रम कार्ड कसे काढावे ? त्याचे फायदे काय ? E-Shram Card
• विचारलेले जाणारे प्रश्न –
- ई श्रम कार्ड कोण काढू शकतो ?
भारतातील राहणारी कोणतीही व्यक्ती जी असंघटीत क्षेत्रातील कामगार आहे.उदाहरणार्थ घर कामगार,फेरीवाले ,रोजंदारीवर काम करणारे,स्थलांतरीत मजूर इत्यादी.
- ई श्रम कार्ड काढण्यासाठी काय काय लागते ?
ई श्रम कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड ,बँक तपशील ,पासपोर्ट फोटो,कामाचा तशील वय ,राहण्याचा आणि कामाचा संभाव्य पुरावा
- मी ई श्रम कार्ड साठी online अर्ज करू शकतो का ?
हो तुम्ही CSC किंवा पोर्टल द्वारे onlineअर्ज करू शकता .
- ई श्रम कार्डचे १००० रुपये कसे तपासायचे ?
eshram.gov.in ला लॉगीन करून व्यवहार नावावर क्लीक करून व्यवहार इतिहासामध्ये जमा झालेली रक्कम तपासा.
- २०२४ मध्ये मी माझ्या ई श्रम कार्डची स्थिती कशी तपासू शकतो ?
eshram.gov.in या साईटवर जाऊन लॉगीन करा त्यांनतर ई आधार कार्ड स्टेटस चेक लिंक शोधा त्यानंतर लिंक वर क्लिक करून तुमचा श्रमिक क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक किंवा UAN क्रमांक टाका लॉगीन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या eshram पेमेंट ची स्थिती तपासू शकता.
- E-Shram Card ला आधार कार्ड कसे लिंक करावे ?
ई श्रम कार्डच्या पोर्टल वर जाऊन आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल नंबर व क्यापचा कोड टाका.आणि OTP पाठवा नंतर वैध वर क्लिक करा स्क्रीनवर असलेल्या वैक्तिक माहिती काळजीपूर्वक चेक करा.
- ई श्रम UAN नंबर कसा ओळखायचा ?
UAN नंबर शोधण्याचे भरपूर मार्ग आहेत ज्यामध्ये ESIC पोर्टल वर ESIC पासबुक ESIC कर्मचारी कार्ड ,योगदानाचे ESIC स्टेटमेंट SMS सेवा यांचा समावेश आहे