
• अवैध रित्या Donkey Route अमेरिकेमध्ये जाणारे भारतीय : चिंतेचा विषय
Donkey Route महाराष्ट्र मधेच नाही तर संपूर्ण भारतीय लोकांमधे अमेरिकेविषयी नेहमी एक आकर्षण असते प्रगत आणि अमेरिकेमधील जीवनशैली आणि त्या ठिकाणी होणारे उत्पन्न बघता प्रत्येक भारतीय अमेरिकेमध्ये जाण्याचे स्वप्न बघत असतो. स्वप्नाचे देश म्हणजे अमेरिका प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आहे. वर्षातून भरपूर मोठ्या प्रमाणात भारतीय अमेरिकेमध्ये जातात.
तर मोठ्या प्रमाणात अमेरिकेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात पण त्या ठिकाणी त्यांना यशस्वी मिळत नाही. स्वप्नाच्या देशात जाण्यासाठी काही लोक अवैध रित्या जाण्याचा प्रयत्न करतात. सध्या अशीच बातमी अमेरिकेमधून येत आहे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवीन राष्ट्रध्यक्ष झाले आणि त्यांनी अवैध रित्या अमेरिकेमध्ये येणाऱ्या लोकांना अटक करण्याचा निर्णय घेतला.
यावर प्रतिक्रिया म्हणून अमेरिकेच्या सीमा रक्षकांनी भरपूर भारतीयांना अवैध रित्या अमेरिकेमध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीयांना अटक केली आणि त्यांना परत मागे म्हणजे भारतात मधे पाठवण्यात आले ही एक अशी घटना आहे भारतीय समाजासाठी हा एक चिंतेचा विषयी आहे. भारतीय समाजाच्या मानसिकतेवर आणि विदेशातील अवैध रित्या होणारा प्रवास यावर प्रकाश टाकणारी बाब आहे.
• अवैध प्रकारे होणारा प्रवास यालाच आपण Donkey Route असेही म्हणतो.
अलीकडे बघता अमेरिकेत जाण्यासाठी अवैध प्रकरचा प्रवास करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठया प्रमाणात वाढलेली आहे.Donkey Route ने जाण्यासाठी बहुतांशी लोक हे पंजाब आणि गुजरात व हरियाणा या राज्यातील जास्त आहे.परदेशात जाऊन चांगल्या प्रकारे पैसे कमविण्याच्या लालसेपोटी ते बाहेर परदेशात जाण्याचा सतत प्रयत्न करत असतात.
पण व्हिजा मिळणे कठीण असल्यामुळे ते अवैध मार्गाचा वापर करतात. अवैध मार्गाने अमेरिकेमध्ये नेण्यासाठी असे खूप काही भारतामध्ये एजेंट आहे जे सामान्य लोकांची फसवणूक करतात व अत्यंत धोकादायक मार्गाने लोकांना नेण्याचा प्रयत्न करतात.

अमेरिकेमध्ये जाण्यासाठी मेक्सीको चे जंगल लागते जे अत्यंत धोकादायक आहे. या मार्गाने जाताना अनेक लोकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. आणि अनेक जण अटक देखील होतात व ते मागे परत पाठविले जातात.
• सध्या कोणती घटना घडली ज्यामुळे Donkey Route हा विषयी चर्चेमध्ये आला.
अलीकडे अमेरिकेच्या सुरक्षा रक्षकांनी अनेक भारतीयांना सीमेवर अटक केली आहे. अनेकांनी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून अमेरिकेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता पण त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात आली त्यांना अटक करण्यात आली.या बातमीमुळे जे लोक अटक झाले त्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.
यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या व एखाद्या मोठ्या गुन्हेगारासारखी वर्तवणूक देण्यात तसेच बेड्या सोबत त्यांना भारतामध्ये परत पाठविले गेले. या कारणामुळे सध्या अलीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
• Donkey Route अवैध प्रवास का होतात –
Donkey Route म्हणजेच अवैध प्रवासाची काही करणे आहेत ते आपण खाली बघू
1) आर्थिक अडचण – आपल्या भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे भारतामध्ये नोकरीं मिळण्याचे प्रमाण खुप कमी आहे.बेरोजगारी मोठ्या प्रमानात वाढलेली आहे. याठिकाणी नोकरीं करून देखील चांगले पैसे मिळत नाही यामुळे हे लोक बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात.
2) व्हिजा मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी –
अमेरिकेमध्ये जाण्यासाठी मोठया प्रमाणात पैसा लागतो तसेच व्हिजा मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागणारे कागदपत्रे हे अनेकांना देणे शक्य होत नाही.
3) एजेंट कडून होणारी फसवणूक –
भारतातील एजेंट च्या जाळ्यामध्ये फसून मोठ्या प्रमाणात त्यांना पैसे देतात व ते खोटे आश्वासाने देऊन धोक्याच्या मार्गाने घेऊन जातात अश्या वेळी बहुतांशी लोक अटक केले जातात.
4) अधिक लालसा – परदेशात जाऊन किंवा अमेरिकेमध्ये जाऊन स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करतात
• अवैध मार्गाने प्रवास करण्याचे धोके
1) जीवघेणा धोका –
अवैध मार्गाने प्रवास करणाऱ्या लोकांना नेहमी जीव घेणा धोका असतो मेक्सीको अमेरिका यामध्ये मोठे जंगल असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मरण पावतात व वेग वेगळ्या आजरांना बळी पडतात.

2) कायदेशीर असणारी समस्या –
भरपूर लोक हे अवैध रित्या सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असतात अश्या वेळी कायदेशीर कारवाई केली जाते व अटक केली जाते भविष्यामध्ये व्हिजा मिळण्याची शक्यता यामुळे कमी जाऊन जाते.
3) आर्थिक नुकसान –
अवैध मार्गाने जाणारे प्रवासी हे नेहमी एजेंट च्या सहकार्याने प्रवेश करतात अश्या वेळी लाखो रुपये खर्च केले जातात व पकडल्या गेल्यानंतर हे सर्व पैसे वाया जातात.
• सामाजिक व सरकारी भूमिका –
1) भारतीय समजामधे जागरूकतेला प्राधान्य देणे –
अवैध रित्या Donkey Route साठी सरकारने कार्यशाळा व मोहिमा तसेच होणाऱ्या धोक्याची माहिती देण्यासाठी शिबीरे आयोजिले पाहिजे.
2) भारतातील बेरोजगारी कमी करणे –
भारतामधील बेरोजगारी कमी करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे ज्यामुळे बाहेर देशात काम कारण्यासाठी जाण्याची गरज पडणार नाही.
3) एजेंट वर कायदेशीर कारवाई –
अवैध रित्या लोकांना परदेशात घेऊन जाण्याचे अमिश दाखवून एजेंट लोक मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन फसवणूक करतात अश्या वेळी या एजेंट वर कारवाई करून जनतेला यापासून वाचण्यासाठी हेल्प लाईन सुरु केली पाहिजे.
• नवीन तरुणाईला सल्ला
1) नेहमी परदेशात जाण्यासाठी जे मार्ग वैध आहेत त्यांचा अवलंब करा. व्हिजा मिळवण्याचा नेहमी प्रयत्न करा.
2) होणारी फसवणूक टाळा –
असे भारतामध्ये खुप एजेंट आहेत त्यांच्यावर विश्वास ठेव्हा नका पैसे वाया घालवू नका.
3) तरुण लोकांनी स्वन बघावे पण वास्तव्याचे –
परदेशात जाऊन पैसे कामविणे वाईट नाही पण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैध मार्गाचा अवलंब करा आणि आपल्या स्वतः च्या देशातच चांगली संधी शोधण्याचा प्रयत्न करा.
• निष्कर्ष –
परदेशात म्हणजेच अमेरिकेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करणे ही एक भारतीयांसाठी चिंतेची बाब आहे. यामधील मुख्य करणे म्हणजे बेरोजगारी आणि एजेंटद्वारे होणारी फसवणूक. या एजेंटश्वर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे यासेच सरकारने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे