DeepSeek मुळे अमेरिका कोमामध्ये आहे.

DeepSeek मुळे अमेरिका कोमामध्ये आहे.

DeepSeek घटना घडली अशी आहे की ज्यामुळे अमेरिकेमध्ये खुओ मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि स्टॉक मार्केट सतत क्रॅश होत आहे. आज आपण या लेखामध्ये काय आहे 

DeepSeek ज्यामुळे अमेरका कोमामध्ये गेला आहे. 2 महिन्यामध्ये असं काय केल ज्यामुळे संपूर्ण जगामध्ये याची चर्चा होत आहे.आज आपण या विषयी चर्चा करणार आहोत.

DeepSeek परिचय – 

आपल्याला माहिती आहे ChatGPT IT क्षेत्रामधील सध्या किंग आहे ज्यांना ChatGPT माहिती नाही तर आपण सर्वात आधी ChatGPT विषयी थोडक्यात माहिती करून करून घेऊ त्यानंतर DeepSeek विषयी बोलू कारण ChatGPT आणि DeepSeek यांचा परस्पर संबंध आहे तर अश्या वेळी सोप्या भाषेमध्ये आतापण या दोघांची माहिती घेऊ.

काय आहे ChatGPT – 

आपण AI बद्दल ऐकले असेल AI म्हणजेच (Artificial intelligence) आर्टिफिशियल इंटिलिजिएन्स म्हणतात याचि सुरुवात Open AI नावाची एक अमेरिकेमध्ये कंपनी आहे या कंपनीने जगामध्ये सर्वात प्रथम AI ची सुरुवात केली आता.

Open Ai या कंपनीचे संस्थापक Sam Altman हे आहे सर्वात प्रथम यांनी मार्केटमध्ये नोव्हेंबर 2022 मधे एक ChatGPT नावाचा एक चॅटिंग बोट हा मार्केट मधे आणला ज्यावेळेस ChatGPT मार्केट मधे या कंपनीने उतरवीला त्याच वेळी काही दिवसातच याने जगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली.

आपल्यामध्ये प्रश्न पडला असेल की हा फक्त एक chat boat आहे यात एवढे काय आहे. तुम्ही जो विचार करत आहात यापेक्षा तो साहजिक आहे पन AI ची खरी ओळख आणि पॉवर काय आहे हे जगाला ChatGPT ने दाखवून दिले.

 ChatGPT काय करू शकतो ? – 

 ChatGPT हा chat बोट आहे यामध्ये आपणा सांभाषण करू शकतो म्हणजे आपण व्हाट्सअप द्वारे जशी चाटून्ग करतो त्याप्रकारे नाही तर आपण कोणताही प्रश्न या ठिकाणी टाईप करून विचारला तर हा काही सेकंदामधे याचे उत्तर देतो परत एकदा प्रश्न पडला असेल की असे काही पान गुगल वर सर्च केल्यानंतर मिळून जाते.

याचे उत्तर हो आहे पण या ठिकाणी अत्यंत काटेकोर पणाने आपल्याला गुगल वर उत्तर मिळतं नाही. ChatGPT या ठिकाणी अत्यंत काटेकोर कोर पद्धतीने आपला प्रश्न वाचून त्याचे उत्तर देतो. Chat got मधे NLP तत्रज्ञान वापरलेले आहे.

 NLP तंत्रज्ञान म्हणजे (Natural Language Processing) हे तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता असणारे व सांगणकांना मानवी भाषा समजून घेण्यास आणि मानवी सांभाषण सारखे उत्तर देण्यास ट्रेन करतो.

 काय आहेत ChatGPT चे फायदे 

1) जर तुम्हाला एखादी माहिती हवी असेल तर अत्यंत जलद रित्या आणि वाटेल त्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला

ती मिळू शकते.

2) सविस्तर अशी माहिती आणि ज्ञान आपल्याला या ChatGPT च्या द्वारे सरकारी कामामधील माहिती, तंत्रज्ञान, आर्यहव्यवस्था श्या वेगवेगळ्या विषयामध्ये माहिती मिळते.

3) शिक्षणामध्ये मदत – विद्यार्थ्यांना जर एखादी गोष्ट जर समजत नसेल तर तो ChatGPT च्या द्वारे अगदी सोप्या भाषेत आपला अभयास करू शकतात.

4) व्यवसाय आणि मार्केटिंग साठी याचा सर्वत्र फायदा करता येतो आपल्या ऑनलाईन असणाऱ्या स्टोर वर मार्केटिंग आणि पोस्ट साठी माहिती लिहून देतो.

5) कोडींग – आपल्याला माहीतच आहे कोडींग करणे किती अवघड आहे आणि कोडींग न करता वेबसाईट ही तयार होत नाही आणि अश्या वेळी ChatGPT कोडींग दवखील करून देतो यावरून आपल्या लक्ष्यात येते की ChatGPT हा किती ऍडव्हान्स लेव्हल चा AI मॉडेल आहे.

अश्या प्रकरची भरपूर कामे हे ChatGPT करू शकतो याला सर्व सामान्य लोक देखील अत्यंत सोप्या पद्धतीने आणि फ्री मधे वापरू शकतात. यामध्ये,Open AI ने सध्या ChatGPT 4 नावाचे पुढचे व्हर्जन काढले आहे.

 हे अधिक सविसतार आणि मानवी सांभाषण केल्यासारळे उत्तर देतो. ChatGPT 4 प्रीमियम असल्यामुळे आपण याचा फायदा देखील घेऊ शकता.

आता आपण बघू DeepSeek ज्याची खरी चर्चा सुरु आहे.

तुमच्या लक्षात आले असेल की ChatGPT काय आहे. ChatGPT चा दुसरा मोठा भाऊ म्हणजे DeepSeek आता लक्ष्यात आले असेल की हे देखील ChatGPT सरळ्हेच कम करत असेल. हो नक्की हे अगदी सेम टू सेम आहे. फक्त एकच की हा चायनीज आहे आणि आपल्याला सर्व काही माहिती चायना जे काही करतो स्वस्तात करतो.

 • कशी झाली DeepSeek ची सुरुवात – 

ही कामोनी चायना ची असून आर्टिफिशल इंटिलिजिएन्स मधे नवीन सुरु झलेली ही कंपनी आहे. ही कामोनी प्रामुख्याने 2023 ला सुरु झाली होती लि्यांग वेन्फेग नावाच्या व्यक्तीने ही कंपनी सुरु केली या व्यक्तीचे जग प्रसिद्ध असा AI सेक्टर मधील नाव आहे.

सर्वात प्रथम DeepSeek नावाच्या कंपनीने DeepSeek -R1 मॉडेलने ChatGPT सरळया तगड्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या मॉडेल ला हरवून जगामध्ये 1 नंबर चे स्थान काबीज केले आहे आणि विशेष म्हणजे ChatGPT ला जेवढा खर्च आले होता याला तर फक्त 52 कोटी रुपये खर्चून हे ChatGPT पेक्षा अधिक पॉवरफुल मॉडेल चायना ने बनवून दाखवले आहे.

 याचा उपयोग सर्वच क्षेत्रामध्ये केला जात आहे आणि याचे रिझल्ट खुओ काही पटीने ChatGPT पेक्षा खूप चांगले आहे. DeepSeek मुळे AI क्षेत्रामधे मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे.

DeepSeek आणि ChatGPT यांच्यामधील फरक काय आहे?

  1. प्रशिक्षणामधील असणारा डेटा – 

 • DeepSeek -R1 हे मॉडेल चायना मधले असल्यामुळे हे चायनीज भाषा किंवा चायना मधील इतर भाषेला घेऊन उत्तम प्रतीने ट्रेन केलेले आहे.यामध्ये चीन ने अत्यंत कमी खर्चमध्ये अधिक याची कार्यक्षमता कशी वाढवता येईल यावर जास्त भर दिलेला आहे.

ChatGPT मधे हे जागतिक स्तरावरील आहे यामध्ये सर्व जगातील डेटा घेऊन हे AI मॉडेल तयार केलेले आहे. ChatGPT जागतिक स्तरावरील असल्यामुळे यमध्ये जास्तीत कास्ट डेटा आहे.

2) बनवणायसाठी आलेला खर्च – 

• DeepSeek – या AI मॉडेल ला बनवणायासाठी 6 मिलियन खर्च म्हणजेच फक्त 52 कोटी मधे याला बनविण्यात आलेले आहे.आणि हे मॉडेल कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त सर्विस देण्याचा मार्केट मधे प्रयत्न करत आहे.

ChatGPT open AI ही कंपनी संपूर्ण जगामध्ये काम करते व तसेच यमद्धे डेटा देखील खूप आहे ChatGPT हा GPU आणि डेटा प्रोसेसिंग च्या उत्तम क्षमतेसह असल्यामुळे यामध्ये खर्च देखील खूप आणि मोठ्या प्रमाणात संसाधने लागलेली आहे.

3) सामाजिक आणि सांस्कृतिक जडनघडण – 

• DeepSeek – आता हे चीन मधे तयार केलेल आहे या कंपनीच्या संस्थापकांनी चीन या देशाला लक्ष्यात ठेवून याची घडण केलेली आहे चीन मधील संस्कृती भाषा इत्यादी यामध्ये जास्त आहे.

ChatGPT हे जागतिक स्तरावरील असल्यामुळे यामध्ये अश्या विशिष्ट्य देशाला लक्ष्यात ना घेता यामध्ये सर्व जगाच्या हिशेबाने तयार केलेल मॉडेल आहे. आणि जगातील सर्वच भाषेमध्ये हे मॉडेल चालते.

4) सुरक्षितता –

DeepSeek – आपल्याला माहिती आहे की चिनी प्रॉडक्ट विषयी या AI मॉडेल वर संपूर्ण पणे चीन देशाच्या सरकारचे नियंत्रण आहे. आणि यामध्ये खूप काही विषयावर मर्यादा देखील असू शकतात व डेटा लेक होण्याची देखील शक्यता आहे.

ChatGPT open AI ही जागतिक स्तरावरील कंपनी आहे. आणि हे मॉडेल सर्वांसाठी खुले आहे आपण यावर कोणत्याही विश्यावर चर्चा आणि माहिती घेऊ शकतो ChatGPT DeepSeek पेक्षा मोठ्या प्रमाणात सुरक्षित आहे.आणि हे मॉडेल कोणत्याही देशाच्या नियंत्रना खाली नसल्यामुळे यामध्ये सर्व प्रकारची सूट आहे आणि कोणतेही मर्यादा यामध्ये नाही.

सतत विचारले जणांरे प्रश्न 

1) DeepSeek काय आहे

DeepSeek हे चायना या देशाने बनवलेले AI मॉडेल आहे यामध्ये आपण ChatGPT प्रमाणे चॅटिंग करू शकतो व हा माणसासारखे आपल्याशी संभाषन करू शकतो.

2) DeepSeek बनवायला किती खर्च आला

DeepSeek बनवायला साधारणतः 52 कोटी रुपये म्हणजे 6 मिलियन खर्च आलेला आहे हा ChatGPT बनवायला जितका खर्च आळा होता त्यापेक्षा हा खर्च खूप कमी आहे.

3) DeepSeek चे संस्थापक कोण आहेत

DeepSeek या AI कामनीचे संस्थापक हे प्रसिद्ध AI सेक्टर मधील नाव आहे यांचे नाव लि्यांग वेनफेंग(Liyang Wenfeng)हे आहेत यांचा जन्म 1985 मधे झाजि्यांग या ठिकाणी जन्म झालेला आहे. 

4) ChatGPT आणि  DeepSeek यामध्ये कोणतें मॉडेल चांगले आहे

ChatGPT हे जागतिक स्तरावरील कम करणारे AI मॉडेल आहे यामध्ये वेग जगातील सर्वच भाषेमध्ये आपण माहिती मिळवू शकतो. आणि DeepSeek हे चीन या देशाला लक्ष्यात घेऊन हे AI मॉडेल तयार केलेले आहे.

 यावर संपूर्ण पणे चीन देशाचे नियंत्रण आहे.यामध्ये जास्त करून चिनी भाषेमध्ये मोठ्याप्रमाणात माहिती मिळते हे सर्व बाबी लक्ष्यात घेतल्या असता ChatGPT हे AI मॉडेल श्रेष्ठ ठरते.

5) ChatGPT ची सुरुवात कधी झाली ?

ChatGPT हे एक AI मोडेल आहे यामध्ये आपण chating करू शकतो chating करून आपण हवी ती माहिती मिळवू शकतो याची सुरुवात नोवेंबर 2022 मध्ये Sam Altman यांनी केली