
•Bharat Net 2025 भारत नेट योजना काय आहे ?
Bharat Net 2025 नमस्कार मित्रांनो आज आपण भारत नेते या योजनेविषयी माहिती घेणार आहोत. केंद्र सरकारची भारत नेट योजना ही ग्रामीण भागातील पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत यामध्ये ऑप्टिकल फायबर ब्रँड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे व सर्व शासकीय प्रणाली ही ऑनलाईन सुरू करणे व सुरळीत करणे या योजनेमागचा उद्देश आहे.
डिजिटल भारत ही संकल्पना सर्व भारतीय नागरिकांना माहिती आहे या संकल्पनेद्वारे भारत नेट योजनेची सुरुवात करण्यात आली आहे भारत नेट योजना या मोहिमेच्या माध्यमातून सर्व ग्रामीण क्षेत्रांमध्ये ब्रॉड बँड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारद्वारे केला जात आहे.Bharat Net 2025
हाय स्पीड ब्रॉड बँड इंटरनेट सेवा ही ग्रामपंचायत स्तरावर असावी या योजनेचा मुख्य उद्देश आहे. भारत नेट योजना बघण्या अगोदर आपण डिजिटल भारत अभियान काय आहे यासंदर्भातील माहिती बघून त्यानंतर आपण भारत नेते योजनेचा आणि डिजिटल भारत अभियान यांचा परस्पर संबंध काय आहे याविषयी माहिती बघू.
• डिजिटल भारत अभियान – Bharat Net 2025
भारतातील प्राटेक नागरिकाला डिजिटल रित्या सक्षम बनवणे या अभियानाचा मुख्य उद्देश आहे डिजिटल इंडिया अभियानाची सुरुवात 1 जुलै 2015 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली मधील इंदिरा गांधी इंनडोअर स्टेडियम मधे करण्यात आली. भारतामध्ये यापूर्वी जास्तीत जास्त कमी ही ऑफलाईन होत होती.
परंतु शक्य होतील तितक्या गोष्टी या ऑनलाईन करण्याचा प्रयत्न आहे यामध्ये सर्व शासकीय कामे सोपी आहेत ऑफलाईन कामामुळे भारतामध्ये पारदर्शकता आणि भ्रष्टाचार याचे प्रमाण खूप वाढले होते या सर्वांना आळा घालण्यासाठी या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
ग्रामीण क्षेत्र आणि शहरी क्षेत्रे यामध्ये असणारी तफावत तसेच डिजिटल सुविधा मधील फरक यामध्ये ग्रामीण भागाला सामावून घेणे तसेच डिजिटल इंडिया च्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल युगामध्ये नवीन रोजगाराच्या संधी निर्मान करणे यामागचा उद्देश आहे. Bharat Net 2025
• भारत नेट योजना परिचय –
भारटनेट योजना खरं जर बघितले तर ही योजना 2011 साली सुरु झलेली आहे परंतु 2015 च्या डिजिटल इंडिया या अभियानाच्या अंतर्गत आल्यानंतर या योजनेला भारत नेट योजना नाव देण्यात आले या आधी या योजनेचे NOFN (नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क) असे होते.

भारतामधील ग्रामपंचायत, शैक्षणिक क्षेत्र तसेच प्रशासनिक कामकाज ऑनलाईन करण्यावर भर आहे. भारत नेते योजनेद्वारे ग्रामीण भागातील माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून सामाजिक आर्थिक विकास करण्याचे प्रयत्न सरकार करत आहे.
• काय आहेत भारत नेट योजनेची वैशिष्ट्ये – Bharat Net 2025
1) जलद गतीने इंटरनेट सेवा प्रदान करणे –
ऑप्टिकल फायबर नेटवर्क च्या मदतीने भारत देशातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्कच्या मदतीने जलद गतीचे इंटरनेट सेवा देणे
प्रशासनिक कामे ऑनलाईन करण्याचा प्रयत्न हा भारत नेट योजनेच्या माध्यमातून केला जात आहे
2) Bharat Net 2025 योजना ही प्रामुख्याने तीन टप्प्यात आयोजित केले आहे पहिला टप्पा एक लाख ग्रामपंचायत त्यांना जोडण्याची मुख्य उद्देश आहेत 2011 ते 2014 पर्यंत हा पहिला टप्पा पार पडला.
3) Bharat Net 2025 योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये उर्वरित एक टप्पा पाच लाख ग्रामपंचायतला कव्हर करणे असा यामागचा उद्देश होतो 2015 ते 2020 पर्यंत हा दुसरा टप्पा पार पाडण्यात आला
4) तिसऱ्या टप्प्यामध्ये 2020 नंतर 2024 पर्यंत संपूर्ण देशभरात ऑप्टिकल फायबर नेटवर्क चे जाळे पसरविणे आणि खाजगी क्षेत्राचा सहभाग यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे हा उद्देश होता. भारत मॅच योजनेच्या द्वारे शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी मिळून हे काम हाती घेतले आपणास दिसून येते.
• भारत नेट योजनेचे फायदे –
- Bharat Net 2025 योजनेचे शैक्षणिक फायदे – भारत नेट योजनेच्या माध्यमातून आपल्या दिसून येते की सर्व भागांमध्ये ग्रामीण क्षेत्रांमध्ये नेट पोहोचलेले आहे ते देखील जलद गतीचे आहे याची सुरुवात सर्वात जास्त प्रगतीचे दिवस म्हणजे लॉक डाउन Bharat Net 2025
ज्यावेळेस पूर्ण आपल्या भारतामध्ये आल्यानंतर सर्व लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व सुविधा ऑनलाईन पद्धतीने केल्या गेल्या सर्व कामे ही ऑनलाईन झाली आणि शिक्षण देखील ऑनलाईन सुरु याचे उत्तम इदाहरण म्हणजे बायजूस कंपनी आहे. अश्या वेगवेगळ्या कंपन्या लॉकडाऊन च्या काळात सुरु झाल्या आणि त्या कंपनी ने प्रगती देखी केली. डिजिटल इंडिया अभियानाला खरी चालना ही लॉकडॉन मधे मोठ्या प्रमाणात मिळालेली आपणास दिसते.
2) आरोग्य क्षेत्रामध्ये फायदा –
आरोग्य क्षेत्रामध्ये याचा कसा उपयोग झाला आहे याचा आपल्याला प्रश्न पडला असेल पन अश्या जलदगतीने असलेल्या इंटरनेट मुळे जर एखाद्या हॉस्पिटल मधे इलाज होत नसेल तर अश्या वेळी डॉक्टर हे विडिओ कॉल च्या माध्यमातून उच्च प्रतीची शास्रक्रिया करू शकतात.

यामध्ये टेलिमेडिसिन नावाच्या सुविधा्यामुळे कितीही अनंतर असो तरी देखील ही सुविधा देता येणे शक्य झाले आहे.
3) रोजगारमध्ये आणि उद्योगधंद्यामध्ये फायदा –
भारत नेट योजनेमुळे इकॉमर्स क्षेत्रात चांगली प्रगती झलेली आपणास दिसत इकॉमर्स क्षेत्र हे फक्त आधी शहरी भागात मर्यादित होते परंतु जलद गतीचे इंटरनेट हे संपूर्ण भारतामध्ये पसरले यावेळेस ई कॉमरर्स उद्योगाची प्रगती ही मोठ्याप्रमाणात झाली. Bharat Net 2025 ग्रामीण भागातील उद्योजक देखील ई कॉमर्स व्यसाय करण्यासाठी सुरु झाले.
• भारत नेट योजनेचे तोटे काय आहेत?
भारत नेट योजना ही सरकारची महत्वाची योजना असली तरीही यामध्ये भरपुर काही त्रुटी आहे जे आपण खाली पाहू या त्रुटी जर दूर करण्याचा प्रयत्न केला तर ही योजना अधिक प्रभावी बनू शकते.
1) भारत नेट योजनेमध्ये लागणार विलंब –
भारत नेट योजना ही 3 टप्प्यामध्ये पूर्ण करण्याचे ठरलेले असताना देखील यामध्ये होणारा विलंब यामुळे सगळीकडून याला अडचणी तयार झाल्या आहेत.ठरल्याप्रमाणे अजूनही भारत नेट योजनेचे प्रकल्प पूर्ण झालेले नाही.
2) तांत्रिक क्षेत्रामधील समस्या –
ऑप्टिकल फायबर म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेमध्ये जमिनीमध्ये खड्डे करून आपण जशी पाण्याची पाईप लाईन करतो त्याच ओरमाने ऑप्टिकल फायबरची पाईपलाईन करणे असते ग्रामीण भागामध्ये तांत्रिक पायाभूत सुविधा या खूप कमी असतात तसेंच ऑप्टिकल फायबर ची जी पाईपलाईन असते गुणवंत्ता टिकवने हे अज्ञान्ट खर्चिक काम असते.
3) तांत्रिक गोष्टीतील प्रशिक्षणाचा अभाव – Bharat Net 2025
ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे प्रमाण शरपेक्षा कमी असते अश्या वेळी जर ऑनलाईन सुविधा सुरु केल्यानंतर तांत्रिक गोष्टीचे प्रशिक्षण देणे खूप अवघड जाते तसेच योग्य प्रशिक्षण व स्थानिक प्रशासनला न दिल्यामुळे सेवा प्रभाविरित्या वापरली जात नाही.
4) अपुरा विजपुरवठा –
आता सर्वांनाच माहिती आहे ग्रामीण भागामध्ये बनेहमीच विजपुरवठा कमी असतो. सरकारने जरी भारत नेट च्या माध्यमातून ऑप्टिकल फायबर इंटरनेट देण्याचा सुरु केले असले तरी अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे ऑप्टिकल फायबर बसविण्यासाठी विलंब होतो.
तसेच ग्रामीण भागामध्ये शेतासाठी असणारी वीज आणि दैनंदिन वीज ही वेगळी असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये आलटूनपालटून वीज देण्यात येत असते पन यामध्ये विजपुरवठा अपुरा असल्यास बाकीचे इंटरनेटशी निगडित असणारी कामे उशिरा होतात. इंटरनेट सेवा देणारी उपकरणे ही स्टेटस कार्यामध्ये ठेवण्यासाठी अडचण तयार होते.
5) भारत नेट चा प्रकल्प संपूर्ण भारतामध्ये आहे – यावरूनच लक्ष्यात येते की यामध्ये खर्च देखील भरपूर आहे अश्या वेळी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राचा सहभाग सरकारने केला आहे परंतु खासगी कंपनीचे म्हणावे तसे यामध्ये सहकार्य दिसायला मिळत नाही यामुळे लागणारा निधी हा मर्यादित झाला आहे तसेच प्रकल्प व्यवस्थापनासाठी मर्यादा आलेली आपल्याला दिसून येते.
6) नेटवर्क ची अडचण –
ग्रामीण भागामध्ये आधीपासूनच नेटवर्क च अडचण आहे अनेक ठिकाणी ज्या ऑप्टिकल फायबर च्या केबल मधे कनेक्शन खराब होते यामुळे जो वापरकर्ता आहेत त्याचा अनुभव खराब होतो.
7) खर्च मधे होणारी वाढ –
योजना सुरु करताना जो खर्च किंवा निधी मंजूर केला गेला परंतु ज्या वेळी योजनेची अंमलबजावणी करण्यात आली वेग वेगळ्या अडचणीमुळे खर्चामध्ये वारंवार वाढ होत गेली. Bharat Net 2025
8) स्थानिक पातळीवर होणारे सहकार्य – ज्या ग्रामीण भागामध्ये फायबर ऑप्टिकल चे कम चालू असते त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन आणि कंपनी यामध्ये समन्वय यामध्ये दिसणारा अभाव यामुळे विलंब मोठ्या प्रमाणात होतो.
• निष्कर्ष – Bharat Net 2025
भारत नेट योजना ही डिजिटल इंडिया अभियानाच्या अंतर्गत येणारी योजना आहे ऑप्टिकल फायबर च्या मदतीने ग्रामीण पातळीवार जल्द गतीने इंटरनेट सेवा देण्याचे सरकारचे उद्देश आहे.स्थानिक पातळीवर डिजिटल सेवा तसेच आरोग्य क्षेत्रामधे व शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुविधा या योजनेमार्फत मिळणार आहे.
• सतत विचारले जाणारे प्रश्न
1) भारत नेट योजना काय आहे?
भारत नेट योजना ही डिजिटल इंडिया अभियानाच्या अंतर्गत चालणारी केंद्र सरकारची योजना आहे ग्रामीण पातळी पर्यंत ऑप्टिकल फायबर इंटरनेट सुविधा देणे यामागचा उद्देश आहे.
2) केंद्र सरकारची जी भारत नेट योजना आहे या योजनेचे मुख्यमंत्री उद्दिष्ट काय आहे?
डिजिटल इंडिया या अभियानाच्या अंतर्गत सुरु झालेल्या भारत नेट योजनेचा मुख्यमंत्री उद्देश म्हणजे देशातील सर्व ग्रामपंचायतींना अत्यंत जलदगतीचे इंटरनेट सेवा प्रदान करणे तसेच शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रामध्ये व उदयोग धंद्यामध्ये या सारख्या सेवा ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून देणे आहे.
3) भारत नेट योजना कधी सुरु झाली?
खरी तर भारत नेट योजनेची सुरुवात ही 2011 मधे झाली पण 2015 साली सुरु झालेले डिजिटल इंडिया अभियानाच्या अंतर्गत सुरु करण्यात आली सर्वात आधी या योजनेचे नाव हे NOFN राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्क असे होते 2015 साली या योजनेचे नाव बदलून भारत नेट करण्यात आले.
4) भारत नेट योजनेच्या अंतर्गत कोणते तंत्रज्ञान वापरले जाते?
भारत नेट मधे प्रामुख्याने ऑप्टिकल फायबर केबल(OFC) वापरले जाते. ही एक ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा आहे जी उच्च प्रतीचे इंटरनेट सेवा देते.
5) भारत नेट योजनेचा सामान्य नागरिकांना कसा फायदा घेता येईल?
भारत नेट योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिकांना सर्व प्रथम आपल्या ग्रामपंचायत शी संपर्क साधावा लागेल व अधिक माहिती जर याविषयी हवी असल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क करावी लागेल.