APAAR ID Card 2025 आपल्याकडे आहे का ?

• काय आहे APAAR ID कार्ड ?

APAAR ID Card हे कधी आपण ऐकले नसेल पण हे कार्ड किती महत्वाचे आहे हे आपण माहिती कातून करून घेणार आहोत. APAAR (ऑटोमेटेड परमानेंट एकेडमिक अकाउंट रजिस्ट्री) भारत सरकारच्या शैक्षणिक विभागामार्फत 2023 मध्ये या अभियानाची सुरुवात झाली.याची मुख्य वेबसाईट apaar.education.gov.in ही आहे भारत सरकारच्या One nation One Student या योजनेच्या माध्यमातून हे अभियान चालविले जाते.

आपली सर्व शैक्षणिक माहिती म्हणजेच आपली सर्व कारकीर्द यामध्ये विद्यार्थ्याचे पुरस्कार,खेळा संदर्भातील माहिती ,शैक्षणिक कागदपत्रे ,एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जातानाची सर्व माहिती या कार्ड मध्ये असणार आहे .आपल्या नाही म्हणजे 1 ली पासून ते आता पर्यंत आपल्या कडे माहिती असते फक्त 10,12,पदवीचे कागदपत्रे पण या व्यतिरिक्त खूप काही माहिती हवी असते ती आपल्याकडे नसते अश्या वेळी APAAR ID Card आपल्या कामी येतो. आपली सर्व शैक्षणिक माहिती या APAAR ID Card मधे असणार आहे आपण 1 ली पासून आत पर्यंत कोणत्या कोणत्या शाळेत ट्रान्सफर केले आहे.APAAR ID Card

आपले सर्व document यामध्ये असणार आहे. 1 ली पासून 12 वी पर्यंतचे विद्यार्थी यांना APAAR ID Card काढण्यासाठी संमती पात्र लागणार आहे जे आप आपल्या शाळेमध्ये जमा करावे लागणार आहे. संबंधित शिक्षक हे APAAR ID Card काढून देतील पण जर आपण 12 चे शिक्षण पूर्ण केले असेल आणि पुढील शिक्षणासाठी आपल्याला APAAR ID Card काढायचे असेल तर आपल्याला ऑनलाईन प्रक्रिया करावी लागणार आहेत

या कार्डच्या माध्यमातून पुढील शिक्षणासाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे देण्याची गरज पडणार नाही कारण कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमची सर्व माहिती दिसणार आहे. चला तर मग बघूया ऑनलाईन पद्धतीने APAAR ID Card कसे काढता येईल

 • APAAR ID Card काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया – 

APAAR ID Card चा फुल्ल फॉर्म Automated Permanent Academic Account Registry ( APAAR ) हा आहे.

1) APAAR ID Card काढन्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला मोबाईल च्या chrome ब्राऊझर ओपन करायचं आहे या ठिकाणी आपल्याला abc.gov.in ही वेबसाईट सर्च करायची आहे.

2) साईटच्या होम पेज वर आल्यानंतर सर्वात वरती उजव्या साईड ला log in नावाचा पर्याय येईल. या ठिकाणी click करायचं आहे. 

3) click केल्यानंतर आपल्या समोर दोन पर्याय येतील यामध्ये Student आणि Awarding Institution असे दोन पर्याय येतील या ठिकाणी आपल्याला student या नावावर

 क्लीक करायचे आहे.

4) Student पर्यायावर click केल्यानंतर येथे आपल्या समोर सर्वात वरती mobail, username, others असे पर्याय दिसतील या ठिकाणी तुमचे जर डिजिलॉकर मधे अकॉउंट असेल तर तुम्ही या तिन्ही पर्याया पैकी कोणत्याही पर्यायचा वापर कर्जन log in करू शकता. जर तजमचे डिजिलॉकर ला अकॉउंट नसेल तर तुम्ही खाली sign up नावाचा पर्याय असेल त्या ठिकाणी क्लीक करायचे आहे.

5) sign up बटनवर क्लीक केल्यानंतर आपला आधार कार्ड ला जो नंबर लिंक आहे तों या ठिकाणी टाकायचा आहे.

6) मोबाईल नंबर टाकल्यानंतर otp सेंड करायचा आहे आपण जो नंबर टाकला आहे त्या नंबर वर otp येईल तो otp या ठिकाणी टाकून व्हेरिफाय करायचा आहे.

7) otp टाकून व्हेरिफाय क्साल्यानंतर खाली select identy type नावाचा पर्याय असेल या ठिकाणी आधार कार्ड select करायचे आहे.

8) आधार कार्ड select केल्यानंतर पुढे पॉप अप उघडेल या ठिकाणी परत एकदा आधार कार्ड select करायचे आहे.

9) परत एकदा आधार select केल्यानंतर खाली आधार नंबर विचारला जाईल आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.

 10) आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली तजमचे पूर्ण नाव विचारले जाईल या ठिकाणी आधार कार्ड वर जसे नाव आहे तसेच नाव या ठिकाणी टाकायचे आहे.

11) पूर्ण नाव टाकल्यानंतर खाली पूर्ण जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर जेंडर select करायचे आहे

12) जेण्डर सिलेक्ट केल्यानंतर आपला आपल्या सोयीनुसार एक username तयार करायचा आहे आणि खाली एक नवीन पिन तयार करायचा आहे.पिन तयार केल्यानंतर खाली व्हेरिफाय करून अकॉउंट ओपन करून घ्यायचे आहे

13) आता अकॉउंट ओपन करताना जर तुमचे अकॉउंट पहिले असेल तर याठिकाणी तुमचे अकॉउंट आहे असे दाखविले जाईल नसेल तर अकॉउंट या ठिकाणी ओपन होईल.

14) आता परत होम पेज वर यायचं आहे या ठिकाणी sign करायचं आहे तुम्ही जो आधार कार्ड ला मोबाईल नंबर टाकला असेल तों या ठिकाणी टाकून otp पाठवायचा आहे आणि व्हेरिफाय करून घायचे आहे. आणि saign in करायचे आहे. आता सुरवातीला तुम्हाला sign in केल्यानंतर identity type विचारली जाईल यामध्ये तुमच्याकडे रोल नंबर असेल तर तों टाका किंवा रजिस्ट्रेशन नंबर, enrolment number तुमचे नवीन ऍडमिशन असेल किंवा यापैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर या ठिकाणी None हा पर्याय निवडायचा आहे.

15) खाली आल्यानंतर तुम्ही कोणत्या विद्यापीठातून ऍडमिशन घेत आहात ते या ठिकाणी टाकायचे आहे.आणि खाली कोणत्या वर्षी ऍडमिशन घेत आहेत ते टाका. आणि सबमिट करा.

16) अश्या पद्धतीने तुम्ही माहिती टाकल्यानंतर तुमचा APAAR ID Card तयार होणार आहे. यामध्ये id नंबर येईल त्याच स्क्रीन शॉट काढून ठेवा आणि तुमच्याकडे सेव करून ठेवा.

17) खाली go to dashboard हा पर्याय येईल या ठिकाणी क्लीक करायचे आहे.या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचा APAAR ID Card तयार झालेला असेल.तुमचा जो आधार कार्डवर जो पासपोर्ट फोटो असेल तो याठिकाणी येणार आहे.

• आता आपण APAAR ID Card कसे डाउनलोड करायचे आहे ते बघू.

1) सर्वात प्लेअस्टोर वर जायचं आहे गेल्यानंतर सरकारचे डिजि लॉकर म्हणून अप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घायचे आहे.

2) डाउनलोड केल्यानंतर अप्लिकेशन ओपन केल्यानंतर भाषा निवडून get started नावावर क्लीक करायचे आहे.

3) log in करण्यासाठी आपण आधीच अकॉउंट ओपन केलेले आहे या ठिकाणज आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि otp सेंड करायचा आहे. Otp व्हेरिफाय करून डिजिलॉकर मधे log in करून घायचे आहे.

4) डिजिलॉकर च्या होम पेज वर आल्यानंतर वरती सर्च पर्याय वर क्लीक करायचे आहे. सर्च बार मधे आपल्याला abc सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर आपल्या समोर लगेच APAAR ID Card दिसेल या ठिकाणी क्लीक करायचे आहे. Click केल्यानंतर तुमची सर्व माहिती दिसेल या ठिकाणी तुम्ही APAAR ID Card काढतांना जी माहिती टाकली होती म्हणजेच ऍडमिशन चे वर्ष,Identity type मधे None select करा. अश्या प्रकारे select केल्यानंतर issue document मधे जाऊन तुम्ही APAAR ID Card Download करू शकता.

 • काय आहे ? डीजी लॉकर Digi Locker –

Digi Locker हे एक सरकारी अप्लिकेशन आहे ज्यामाधेस आप्ल्याला आपले सर्व सरकारी कागदपत्रे मिळतात त्यासाठी आपल्याला यामध्ये account बनवणे महत्वाचे असते.यामध्ये आपल्यालाला आधार कार्ड ,PAN card,मतदान कार्ड ,driving licence अश्या प्रकारची महत्त्वाची कागदपत्रे मिळतात तसेच आपल्या सोयीनुसार आपली बाकीची महत्त्वाची कागदपत्रे देखील आपण यामध्ये सेव करू शकतो .

 • निष्कर्ष 

APAAR ID Card हे One Nation One Card च्या केंद्र सरकारच्या योजनेमर्फत चालविले जाणाऱ्या अभियानाद्वारे काढले जाते यामध्ये आपली सर्व प्रकारची शैक्षणिक माहिती या कार्डद्वारे माहिती करता येऊ शकते. ज्या प्रकारे आपण आधार कार्डचा वापर करतो अगदी तश्याच प्रकारे या कार्ड चा उपयोग शैक्षणिक कामासाठी करता येणार आहे. तर ही सर्व प्रक्रिया आपण या लेखाद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. अश्याच उपयोगी माहितीसाठी आपण yojnavikas.com च्या whats app ग्रुप ला जॉईन करू शकता किंवा इंस्टग्राम अकॉउंटला follow करू शकता.

 • सतत विचारले जाणारे प्रश्न 

1) APAAR ID कार्ड चा फुल फॉर्म काय आहे? 

APAAR ID Card चा फुल फॉर्म Automated Permanent Academic Account Registry म्हणजेच APAAR होय.

2) APAAR ID Card चा फायदा काय आहे? 

APAAR ID Card मधे आपली सर्व शैक्षणिक माहिती या कार्ड मधे असते.या कार्ड द्वारे आपली सर्व कागदपत्रे, शैक्षणिक वर्ष, इत्यादी माहिती या कार्ड द्वारे मिळू शकतात.

3) Apaar Id चे तोटे काय आहेत? 

कार्डमुळे शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवणे हे एक आव्हनात्मक काम आहे यामुळे शिक्षकांवर याच प्रशासनिक बाजार येऊ शकतो.

4) APAAR ID कधी सुरु करण्यात आला? 

APAAR ID कार्ड राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत सुरु कारण्यात आला.

5) APAAR ID Card चा मुख्य उद्देश काय आहे? 

APAAR ID Card हे विद्यार्थ्यांचा सर्व उपलब्धी दर्शवितो यामध्ये कागदपत्रांमध्ये होणार घोळ या कार्ड द्वारे संपूर्णपणे नष्ट होणार आहे आणि विद्यार्थ्याने आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये म्हणजे खेळामध्ये शिक्षणामध्ये शिष्यवृती, पुरस्कार यासारखी माहिती या कार्ड मधे असते.

6) apaar id official website काय आहे ?

apaar.education.gov.in ही अपार आयडी कार्ड काढण्यासाठी ची ऑफिशियल वेबसाईट आहे.