
• Maharashtra Police Bharti 2025 Information.
Maharashtra Police Bharti 2025 Information नमस्कार मित्रांनो आज आपण yojanavikas.com या वेबसाईट द्वारे पोलीस भरती सुंदर प्रति संपूर्ण प्रक्रियेबद्दल माहिती घेणार आहोत सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिले तर सरकारी नोकरी मिळवणे हे खूपच कठीण झाले आहे. कमी जागेसाठी खूप भरपूर मोठ्या प्रमाणावर उमेदवारांचे अर्ज येत असतात. सरकारी नोकरी साठी सध्याच्या काळात पोलीस भरती हा सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. पोलीस भरतीमध्ये देखील लाखोच्या संख्येने उमेदवार सहभागी होत असतात.
सर्वप्रथम बघू की पोलीस भरतीमध्ये कोण कोणत्या खात्यात भरती केली जाते. पोलीस भरती अंतर्गत शहर पोलीस,ग्रामीण पोलीस,राज्य राखीव दल, पोलीस लोहमार्ग पोलीस,कारागृह पोलीस यासारख्या खात्यामध्ये भरती केली जाते
या लेखांमध्ये दिलेली माहिती ही नवीन उमेदवारांसाठी नक्कीच फायदेशीर राहणार आहे पोलीस भरती संदर्भातील सर्व माहिती व प्रक्रिया या लेखांमध्ये दिलेली असून काळजीपूर्वक वाचून यावर अंमलबजावणी केल्यास निश्चितच उमेदवारांना काही शंका राहणार नाही. या माहितीमुळे पोलीस भरती विषय असणारे गैरसमज नक्कीच दूर होतील.
आगामी येणाऱ्या 2025 मध्ये पोलीस भरतीची तयारी जे उमेदवार तयारी करत आहे या माहितीमुळे त्यांच्या मनामध्ये पोलीस भरती विषय असलेले गैरसमज संपूर्ण दूर होतील. मागील पोलीस भरती बघता आताचे पोलीस भरती मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात उमेदवारांचा सहभाग नोंदवलेला दिसत आहे व पोलीस भरती मधील स्पर्धा ही वाढतच चालली आहे. सध्या तरी पोलीस भरती होणे सोपे नसले तरी खूप मुलांचे पोलीस होण्याचे स्वप्न असते. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलांना पोलीस भरतीची जास्त ओढ असलेली दिसून येते. मागील पोलीस भरती बघता जास्तीत जास्तीत उमेदवार हे ग्रामीण भागातीलच पोलिस झालेले दिसतात. याच कारणामुळे ग्रामीण भागात उमेदवारामध्ये चढाओढ लागलेली दिसून येते. चला तर आपण पोलीस भरती बद्दल सविस्तर माहिती बघूया.Maharashtra Police Bharti 2025 Information
• प्रामुख्याने पोलीस भरतीमध्ये कोणत्या खात्यामध्ये भरती केली जाते ?
1) ग्रामीण पोलीस शिपायी
2) शहर पोलीस शिपायी
3) कारागृह पोलीस शिपायी
4) चालक पोलीस शिपायी
5) लोहमार्ग पोलीस शिपायी
6) राखीव पोलीस शिपायी
अशा प्रकारे या सहा खात्यामध्ये पोलीस शिपाईच्या जागा भरल्या जातात.
• आपण थोडक्यात जाणून घेऊ की पोलीस भरती प्रक्रिया कशी असते ?
1) सुरुवातीला फॉर्म भरणे
2) त्यानंतर शारीरिक चाचणी
3) लेखी परीक्षा
4) फायनल मेरिट

• आता पोलीस भरती संदर्भातील संपूर्ण सविस्तर माहिती बघू.
• फॉर्म भरणे –
पोलीस भरती चे अर्ज भरण्यासाठी जी तारीख असते त्या तारखेच्या आधी वर्तमान पत्रामध्ये पोलीस भरतीची जिल्ह्यनुसार पदांची जाहिरात येते. आपआपल्या पद्धतीने प्रत्येक जिल्हा जाहिरात वर्तमान पत्रात देत असतो परंतु अर्ज भरण्यासाठीची तारीख आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही Maharashtra Police Bharti 2025 Information संपूर्ण महाराष्ट्रात एकच असते.फॉर्म भरत असताना आधी रजिस्ट्रेशन करावे लागते व नंतर फॉर्म भरला जातो.सगळे ओरिजिनल कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सोबत असावी लागतात.
फॉर्म भरल्यांनतर प्रत्येक जिल्ह्यात येणाऱ्या अर्जाची पडताळणी केली जाते व नंतर उमेदवारांना त्यांच्या प्रवेशपत्र संदर्भातील माहिती SMS द्वारे उमेदवारांना पोहचवली जाते त्यांनतर उमेदवारांनी ते प्रवेश पत्र डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवावे लागते.
• शारीरिक चाचणी –
शारीरिक चाचणीची माहिती घेण्याआधी आपण शारीरिक चाचणीसाठी पात्रता काय आहे ते बघू.
• पात्रता –
1) पोलीस शिपायी पदासाठी भरती करणाऱ्या मुलांची उंची ही कमीत कमी 165 cm असणे गरजेचे त्यापेक्षा कमी उंची असल्यास तो उमेदवार पात्र राहत नाही. त्याचप्रमाणे मुलींसाठी कमीत कमी 150 cm उंची असावी.
2) राज्य राखीव दल पदासाठी मुलांची कमीत कमी उंची 168 cm असावी.
3) चालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी चालक परवाना असणे गरजेचे आहे.
4) बॅण्ड्समन साठी नमूद केलेल्या वाद्या पैकी एक वाद्द वाजविण्याची पात्रता असणे गरजेचे आहे.
पोलीस भरती मधे शारीरिक चाचणी साठी 100 मीटर धावणे, गोळा फेक, 1600 मीटर धावणे या तीन चाचण्या द्याव्या लागतात ही सर्व चाचणी 50 मार्कांची असते. चाचणी दिल्यानंन्तर शेवटी शारीरिक चाचणीचे मेरिट लागते व मेरिट मधे आलेले उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र असतात.
• 1600 मीटर धावण्यासाठी 5 मिनिटे 10 सेकंद एवढा वेळ असतो
• मुलींना 800 मिटर धावण्यासाठी 2 मिनिटे 50 सेकंद एवढा वेळ असतो.
• 100 मीटर धावण्यासाठी मुलांसाठी 11.50 सेकंद एवढा वेळ असतो
• 100 मीटर धावण्यासाठी मुलिंसाठी 13.50 सेकंद एवढा वेळ असतो
• गोळा फेक मुलांसाठी 8.50 मीटर तर मुलींना 6 मीटर असतो.
पोलीस भरती शारीरिक चाचणी साठी 1 वर्ष ते 6 महिने तयारी करावी लागते तेव्हा कुठे शारीरिक तयारी चांगली होते.
• पोलीस भरती लेखी परीक्षा 2025 –
जे सुरुवातीला उमेदवारांना प्रवेश पत्र मिळतात ते पत्र फक्त शारीरिक चाचणीसाठी असते.जे उमेदवार शारीरिक चाचणीच्या मेरिट मधे असतात त्यांना वेगळे प्रवेश पत्र देण्यात येते. जिह्याने ठरवून दिलेल्या सेंटर वर ते दाखवल्यानंतर लेखी परीक्षेसाठी बसता येते.

लेखी परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी,अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्यकरण या विषयांचा समावेश असतो.लेखी परीक्षेमध्ये या प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न विचारले जातात परीक्षा ही 100 गुणांची असते. चालू घडामोडी साठी तुम्ही रोजचे वर्तमान पात्र, बातम्या, मासिक तसेच मागील झालेल्या प्रश्न पत्रिका सोडविणे देखील गरजेचे असते.
• महत्वाचे
लेखी परीक्षा झाल्यानंतर शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा या दोन्हीचे गुण मिळवून कॅटेगरी नुसार मेरिट लावले जाते व उमेदवारा ची निवड केली जाते.
• लेखी परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधे – दिनदर्शिका, सांकेतिक माला, वय, अक्षरमाला, नाते संबंध, दिशा आकृती इत्यादी
विषयावर प्रश्न विचारले जातात.
• अंकगणित – अंकागणित विषयामध्ये लसावि मसावि, बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, नफा तोटा, सरासरी, भूमिती, सरळव्याज इत्यादी विषयावर प्रश्न विचारले जातात. तुम्हाला आभास् करताना या विषयावर जास्त अभ्यास करने गरजेचे आहे.
• मराठी व्यकरण – मराठी व्यकरण या विषयामध्ये वर्णमाला, अलंकार, अव्यय, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, संधी यासारखे विषयावर प्रश्न विचारले जातात.
• सामान्य ज्ञान व चालू घडामोडी – Maharashtra Police Bharti 2025 Information
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या साठी सामान्य ज्ञान या विषयामध्ये भूगोल, इतिहास, सामान्य विज्ञान, अर्थशास्र,भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास यासारखे विषय असतात तसेच या विषयाचा अभ्यास करण्यासाठी क्रमिक पुस्तके 4 ते 12 पडयंतच पुस्तके अत्यंत उपयोगी पडतात तसेच चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी दैनिक, मासिक, रोजच्या वाचणात असणे खूप गरजेचे आहे.
Yojanavikas.असेच नवनवीन व उपयुक्त माहिती आपल्या ब्लॉग वर टाकत असते. वरील दिली गेलेली माहिती अत्यन्त उपयुक्त असून तरी आपण सर्वांनी जो पोलीस भरती करणाऱ्या नवीन उमेदवाराला नक्की share करा.
नवीन पोलीस भरती उमेदवारांना कागदपत्राची काही जास्त माहिती नसते खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वयाची अट कमी असते व कॅटेगरी च्या नुसार महाराष्ट्र सरकारने वेग वेगळ्या कॅटेगरी नुसार वयाची अट दिलेली आहे तसेच उमेदवाराचे कागदपत्रे ही महाराष्ट्र राज्याचा पोलीस भरतीचा GR निघण्या आगोदरची असावी याची उमेदवाराने काळजी घ्यावी तसेच पोलीस भरतीमध्ये खेळाडू,होम गार्ड,NCC candidate,धरणग्रस्त,प्रकल्पग्रस्त इत्यादी उमेदवारांसाठी देखील आरक्षण महाराष्ट्र सरकारने दिले आहे.मागील पोलीस भरती पाहता पोलीस भरतीमध्ये मुलाखत होत होती
परंतु 6 ते 7 वर्षापासून मुलाखत हा प्रकार वगळण्यात आला आहे आता फक्त शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा आहे या दोन्हीची मिळून उमेदवाराची निवड केली जाते.मागील पोलीस भरतीमध्ये 100 मीटर धावणे, 5 किलोमीटर धवणे, लांब उडी, पूल अप्स, गोळा फेक, असे 5 प्रकार प्रत्येकी 10 मार्कसाठी होते एकूण 100 मार्कांची शारीरिक चाचणी आधी होती त्यांनातर भरतीमध्ये आधी लेखी परीक्षा सुरु करण्यात आली व लेखी परीक्षेनंतर शारिरिक चाचणी घेण्यात येत होती परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनी या विरोधात आंदोलने केली व सर्व बदल काढण्यात आले.
आता फक्त शारीरिक चाचणी यामध्ये १०० मिटर धावणे,गोळा फेक,5 किमी धावण्याऐवजी आता फक्त १६०० मीटर धावणे आहे नवीन नियमानुसार पोळीचे भरतीमध्ये ५० गुणांची शारीरिक चाचणी १५ मार्क Maharashtra Police Bharti 2025 Information साठी १०० मिटर धावणे,१५ मार्क साठी गोळा फेक आणि २० मार्क्साठी १६०० मीटर धावणे अशी शारीरिक चाचणी आहे व त्यांनंतर लेखी परीक्षा होते व या दोन्हीची मिळून निवड यादी बनवून कागदपत्रे तपासण्यासाठी उमेदवार बोलावले जातात.कागदपत्रे तपासल्याननंतर उमेदवारांना ट्रेनिंग साठी बोलावले जाते.