
• HSRP Number Plate 2025 असा करा ऑनलाईन अर्ज
नमस्कार मित्रांनो 1 एप्रिल 2025 पासून सरकारने HSRP गाड्यांना नंबर प्लेट असणे अनिवार्य केलेले आहे. आज आपण HSRP Number Plate काय आहे याचे फायदे काय आहेत तसेच आपण आपल्या गाडयांसाठी कश्या प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो याबद्दल सर्व सविस्तर माहिती या लेखा द्वारे बघणार आहोत.
आपण अजूनही आपला योजनविकास चा व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लवकर जॉईन करून घ्या अशीच नवीन नवीन माहिती आपल्याला मोबाईल द्वारे मिळेल. चला तर मग बघूया HSRP काय आहे.
HSRP Number Plate 2025 1 एप्रिल च्या आगोदर तुम्हांला ही नंबर प्लेट लावणे बंधन कारक आहे यामध्ये RTO च्या नियमानुसार नंबर प्लेट नसलेल्या वाहनाना फाईन पडणार आहे तर काळजीपूर्वक आपल्या गाडीला HSRP नंबर प्लेट आहे की नाही हे चेक करून नसल्यास ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करून होम डिलिव्हरी करून नंबर घरी आणू शकता.
• काय आहे HSRP –
HSRP म्हणजे High Security Ragistration Plate आहे. सरकारी नियमानुसार HSRP वाहनाना अश्या प्रकारची नंबर प्लेट असणे आवशयक आहे. ही नंबर प्लेट वापरण्याचे वैशिष्ट्ये खुप आहेत खाली आपण काही वैशिष्ट्ये बघू.
1) अँटी काउंटर फिट फिचर – HSRP Number Plate 2025
आज कल आपण बघतो की बनावट पद्धतीचे नंबर प्लेट मोठया प्रमाणात वापरले जात आहेत. यामुळे वाहणाचा गैर वापर होत आहे आणि गुन्हेगारी देखील खूप वाढली आहे. या HSRP Number Plate 2025 ही एक स्टील ची असल्यामुळे ही सहज पणे वाकवता येत नाही तसेच तोडता ही येत नाही.
या नंबर प्लेट मधे होलोग्राम, तसेच युनिक लेझर कोड, आणि काही सुरक्षा चिन्हे आहेत या कारणामुळे या बनावट पद्धतीने नंबर प्लेट बनविणे कठीण आहे.HSRP Number Plate 2025

2) क्रॉमियम स्टिकर –
प्रत्येक वाहणाला सरकाने आता HSRP अनिवार्य केलेले आहे यामध्ये एका पद्धतीचे क्रॉमियम आधारित स्टिकर दिले जाते या स्टिकर मधे वाहणाचे इंजिन नंबर, HSRP Number Plate 2025 चासिस नंबर, आणि रजिस्ट्रेशन नंबर यासारखी माहिती या स्टिकर मधे असते. ज्यामुळे वाहणाची व वाहण मालकाची सुरक्षितात अधिक वाढते
3) युनिक पद्धतीचे आईडेंटी फिकेशन –
HSRP मधे एक विशेष प्रकरचा नंबर असतो HSRP नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर हे दोन्ही नंबर एकमेकांशी जोडलेले असतात. हे नंबर एक डेटा बेस मधे साठविले जातात. या सर्वामुळे वाहणाची ओळखा करणे हे सहज आणि सोपे होते.
4) सरकारची मान्यता –
HSRP प्लेट ही सरकारच्या अधिकृत असल्यामुळे सर्व नागरिकांना या नंबर प्लेट चा वापर करणे बंधनकारक आहे.
• HSRP नंबर प्लेट लावण्याचा मुख्य उद्देश –
1) वाहन चोरी किंवा गुन्हेगारी रोखणे – HSRP Number Plate 2025
HSRP मुळे वाहणारे चोरीला आळा बसणार आहे तसेच बनावट नंबर प्लेट बनविणे तसेच वाहणाचा होणारा गैर वापर या सर्व गोष्टीला आळा बसणार आहे.
2) सुरक्षा –
HSRP मुळे बनावट नंबर रोखल्या जातात व वाहने आणि वाहणधारकांना अधिक सुरक्षा प्रदान होते.
3) केंद्रीकृत केला जाणारा डेटा –
HSRP मुळे प्रत्येक वाहणाची वेगवेगळ्या पद्धतीने माहिती ही सुरक्षित जाणार आहे ज्यामुळे सरकारला वाहणाच्या माहितीचा सोप्या पद्धतीने अभ्यास करता येईल HSRP Number Plate 2025
• आता आपल्याला जर ही HSRP नंबर प्लेट बसवायची असेल तर फी किती राहील?
सगळ्या प्रकरच्या वाहनाना ही फी वेग वेगळी आहे त्यापैकी दोन चाकी वाहणासाठी 531 रुपये, तीन चाकी वाहनांसाठी 590 रुपये आणि चार चाकी गाड्यांसाठी 879 रुपये राहणार आहे. आता आपण या HSRP नंबर प्लेट साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा हे सविस्तर ओने माहिती करून घेऊ.
• HSRP नंबर प्लेट साठी अर्ज कसा करायचा?
1) सर्वात प्रथम transport.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट वर यायचं आहे. होम पेज वर आल्यानंतर मेनू मधे आल्यानंतर HSRP online booking असा पर्याय असेल या ठिकाणी क्लीक करायचे आहे. क्लीक केल्यानंतर आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये high security Ragistration plate Online असा पर्याय दिसेल यामध्ये आपल्याला RTO ऑफिस सिलेक्ट करायचे आपण ज्या जिल्ह्यात असाल किंवा आपला जो RTO HSRP Number Plate 2025 क्रमांक असेल या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आणि खाली सबमिट बटनवर क्लीक करायचे आहे.
2) सबमिट बटनवर क्लीक केल्यानंतर तुम्ही नवीन वेबसाईट वर याल यामध्ये दोन पर्याय दिसतील high security Ragistration Plate आणि HSRP Replacement असे दोन पर्याय असतील यामध्ये यामध्ये कन्फयुज होऊ नका यात book High Security Ragistration Plate यामध्ये नवीन नंबर प्लेट काढण्यासाठी हा पर्याय आहे.
तसेच दुसरा पर्याय जो आहे HSRP Replacement या मधे आपल्याकडे असढीच HSRP ची नंबर प्लेट असेल आणि ती खराब झलेली असेल ती बदलण्यासाठी हा पर्याय आहे तर आपण आता नवीन नंबर प्लेट साठी अर्ज करणार आहोत तर पहिल्या क्रमांक वर असणाऱ्या पर्याय वर क्लीक करू.
3) book नावावर क्लीक केल्यानंतर पुढचे पेज ओपन होईल आता या सर्व 6 स्टेप आहेत या आपल्याला एक एक करून पूर्ण करायच्या आहेत सर्वात प्रथम booking Details, Vehicle Information HSRP Number Plate 2025
या ठिकाणी आपल्याला स्टेट टाकायचा आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. खाली आल्यानंतर चासिस नंबर टाकायचा आहे. पुढे इंजिन नंबर व खाली आपला जो काही मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे.
इंजिन नंबर आणि चासिस नंबर टाकताना शेवटचे 5 अंक जरी टाकले तरी चालतात. मोबाईल नंबर टाकल्यानंतर कॅपचा टाकायचा आहे. आणि खाली click here या पर्यायावर क्लीक करा.
4) पुढे आल्या नंतर तुमच्या वाहणाची आपोआप या ठिकाणी माहिती येणार आहे सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे. खाली आल्यानंतर contact information मधे जो कोणी वाहणाचा HSRP Number Plate 2025 मालक असेल त्याचे नाव टाकायचे आहे.
खाली मेल आयडी टाका. खाली आल्यानंतर बिलिंग ऍड्रेस मधे जो काही तुमचा आधार कार्डचा पत्ता असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. सर्व टाकून झाल्यावर next बटनवर क्लीक करायचे आहे. जो आपण मोबाईल नंबर टाकला आहे या ठिकाणी एक otp येईल हा otp या ठिकाणी टाकायचा आहे.

आणि next करायचं आहे. आता next केल्यानंतर आपण दुसऱ्या स्टेप वर आलेलो आहोत.
5) दुसऱ्या स्टेप वर आल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला दोन पार्याय दिसतील एक म्हणजे Appointment at Affixation centre आणि Home Delivery अश्या प्रकारचे दोन पर्याय असतील यामध्ये पहिल्या पर्यायामध्ये appointment घेऊन सेंटर ला जाऊन तुम्ही नंबर प्लेट बसवू शकता.HSRP Number Plate 2025
आणि दुसऱ्या पर्यायामध्ये होम डिलिव्हरी मिळते सध्या ही काही पिन कोड वर उपलब्ध आहे ते चेक करून आपण करू शकता यात होम डिलिव्हरी साठी काही अतिरिक्त चार्जेस घेतले जातात.या ठिकाणी चेक करण्यासाठी दुसऱ्या पर्यायावर क्लीक करा.
आणि पिन टाकून check availability यावर क्लीक केल्यानंतर आपल्या लगेच समजते की या पिन कोड वर ही सेवा उलब्ध आहे की नाही. या ठिकाणी आपण पहिला जो पर्याय आहे त्या नुसार आपण प्रक्रिया करणार आहोत म्हणजे appointment घेऊन आपण ही प्रक्रिया करू.HSRP Number Plate 2025
आता या ठिकाणी centre appointment या पार्यायावर क्लीक करू आणि दुसऱ्या पेज वर आल्यानंतर या ठिकाणी जिल्हा टाकायचा आहे आणि पिन कोड टाकायचा आहे किंवा near me या पार्यायावर क्लीक केल्यानंतर आपल्या जवळ कोणत्या सेंटर ला ही सेवा चालू आहे हे दिसते. आपल्या जवळचा जो काही सेंटर असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे. आणि confirm Dealer या पर्यायावर क्लीक करायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला तारीख आणि वेळ दाखविला जाईल कन्फर्म डीलर वर क्लीक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर तारीख आणि टाइम दाखविला जाईल.HSRP Number Plate 2025
आपल्या सोयीनुसार तारीख आणि वेळ जी काही उपलब्ध असेल ती निवडायची आहे. आणि खाली confirm and proceed या ठिकाणी क्लीक करायचे आहे. पुढे आल्यानंतर आपल्या समोर गाडीची सर्व माहिती दाखविली जाईल.
आणि आपण जो स्लॉट book केला आहे त्या बद्दल सर्व माहिती दाखविली जाईल. खाली आल्यानंतर confirm and proceed या बटनवर क्लीक करायचे आहे.
6) प्रोसेस केल्यानंतर पुढे आपल्या समोर गाडीची माहिती परत एकदा येईल ती सर्व माहिती चेक करून घ्यायची आहे. आणि टोटल रक्कम किती लागणार आहे ती या ठिकाणी दाखविली जाईल खाली आल्यानंतर i agree या चौकटी मधे क्लीक करून pay online या बटनवर क्लीक करायचे आहे.
या ठिकाणी आपण 4 व्हिलर साठी करत आहोत तर 879 रुपये दाखवत आहे pay online या वर क्लीक केल्यानंतर पुढचे ओलेज आपण होईल यामध्ये आवळ्या समोर QR कोड HSRP Number Plate 2025 ने पैसे भरू शकता किंवा कार्ड द्वारे देखील आपण पेमेंट करू शकतो. या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर थोडं थांबायचं आहे.
आणि वेबसाईट आपल्याला आपोआप दुसऱ्या पेज वर घेऊन जाईल या ठिकाणी आपल्याला अपॉइंटमेंट ची पावती दाखवली जाईल ती डाउनलोड करून घ्यायची आहे. आता आपण जी तारीख निवडली आहे त्या दिवशी आपल्याला ही पावती लागणार आहे.
सेंटर ला जाताना आपल्या सोबत गाडी असणे तसेच पेमेंट केल्याची पावती आणि गाडीचे RC Book या ठिकाणी लागणार आहे न चुकता सर्व कागदपत्रे सोबत घेऊन HSRP Number Plate 2025 जाऊन आपल्या गाडीची नंबर प्लेट बसवून घायची आहे.
या लेखामध्ये आपण HSRP नंबर प्लेट साठी अर्ज कसा करायचा या बद्दल ची सर्व माहिती बघितली आहे. हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा ज्यांना या नवीन नियमां विषयी माहिती नाही. धन्यवाद.
• सतत विचारले जाणारे प्रश्न
1) HSRP म्हणजे काय?
HSRP म्हणजे High Security Ragistration Plate याचा अर्थ होतो.
2) HSRP नंबर प्लेट चे नियम काय आहे?
HSRP नंबर ओलेत ही एक सुरक्षित नंबर प्लेट आहे यामध्ये होलोग्राम, स्टिकर असल्यामुळे सर्व डेटा जो वाहनधारक आणि वाहणाचा डेटा यामध्ये असतो. सरकारला वाहन तपासण्यासाठी सोयीस्कर जाते.
3) HSRP नंबर प्लेट कधी पासून सुरु होणार आहे?
1 एप्रिल 2025 पासून महाराष्ट्र राज्यात HSRP प्रकारची नंबर ओलेत असणे बंधनकारक केले आहे. याची सुरु वाट कर्नाटक सरकारने सर्वात प्रथम 1 एप्रिल 2019 ला केली होती.