Farmer Id Card 2025 मध्ये आता सर्व शेतकऱ्यांना झाले अनिवार्य

• Farmer Id Card 2025 मध्ये आता सर्व शेतकऱ्यांना झाले अनिवार्य 

नमस्कार मित्रांनो आज आपण Farmer Id Card विषयी माहिती घेणार आहोत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी Farmer Id Card हे अनिवार्य केलेले आहे. या कार्ड चे भरपूर असे फायदे आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना या ओळखपत्राचा मोठ्याप्रमाणात लाभ मिळणार आहे.

काय आहे Farmer Id Card याचा कश्या पद्धतीने लाभ मिळणार आहे तसेच हे ओळखपत्र ऑनलाईन पद्धतीने कसे काढायचे याबाबतची सर्व सविस्तर माहिती आज आपण या लेखाद्वारे बघणार आहोत. अजूनही आपण आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर लवकर जॉईन करून घ्या अशीच नवीन नवीन माहिती आपल्याला आपल्या मोबाईल वर मिळत राहील.

• काय आहे Farmer Id Card 2025 – 

Farmer Id Card 2025 महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी हे Farmer Id Card अनिवार्य केलेले आहे यामध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती साठविली जाणार आहे. हे एक प्रकारचे ओळखपत्र असणार आहे जसे आधार कार्ड आहे त्याच प्रमाणे शेती संबधी सर्व माहिती याद्वारे दिली जाणार आहे.

 महाराष्ट्र सरकारने ही योजना 2019 मधे सुरु केली होती आणि आता हे ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांना अनिवार्य केलेले आहे.या कार्ड द्वारे शेकऱ्यांना सबसिडी, विमा, कर्जमाफी या सारख्या विविध शासकीय योजनाचा लाभ मिळणार आहे.

Farmer Id Card मुळे जे काही PM Kisan योजनेचा जो काही हफ्ता मिळतो तो मिळण्यासाठी आता Farmer Id Card असणे आवश्यक आहे. तसेच बँकेतून तुम्ही जर शेती संदर्भात कोणतेही प्रकारचे पीक कर्ज घेत असाल तर या ठिकाणी देखील Farmer Id Card लागणार आहे.Farmer Id Card 2025

• Farmer Id Card सुरु करण्याचा सरकारचा उद्देश – 

1) Farmer Id Card चा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांची असणारी ओळख ही अधिक सुलभ करणे व शेती संदर्भातील योजणांचा लाभ मिळवून देणे.

2) शेतकऱ्यांची योग्य प्रकारे ओळख – शेतकऱ्यांच्या नावाखाली समजमध्ये असे खुप काही लोक आहे जे पात्र नसताना देखील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजनाचा लाभ घेतात अश्या वेळी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या ओळख पत्रामुळे अचूक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे व पारदर्शकता वाढेल.

3) शेतीच्या बाबतीत मिळणाऱ्या योजना – 

Farmer Id Card मुळे शेतकऱ्यांना मिळणारा विमा, योजना, कर्जमाफी या सारख्या योजना अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मिळतात.

4) Farmer Id Card 2025 कामातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता – 

या आधी शेतकऱ्यांना मिळणारा लाभ आणि योजना यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत होता आता या Farmer Id Card मुळे शेतकऱ्यांची ओळख तर होणारच आहे त्याच बरोबर कामातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

 5) डिजिटल पद्धतीने शेतकऱ्याची माहिती साठविणे – 

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यांची असणारी सर्व माहिती ही या ओळख पत्रानुसार डिजिटल पद्धतीने साठविली जाणार आहे. ज्यामुळे भविष्यामध्ये ज्या काही योजना येतील त्याची अंमलबजावणी योग्य आणि सोपी होईल.

5) शेती क्षेत्राचा विकास करणे आणि उतोदान क्षमता वाढविणे – Farmer Id Card 2025

या ओळख पत्रामुळे शेतकऱ्यांना लागणारे तंत्रज्ञान, साहित्य, तसेच आर्थिक प्रकरची मदत ही लवकर आणि सहज मिळत असल्यामुळे शेतीमाधील उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

 • Farmer Id Card काढण्याची संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे हे आपण महियी करून घेऊ.

1) सर्वात प्रथम गूगल मधे mhfr. agristack.gov.in या अधिकृत वेबसाईट ला सर्च करून होम पेज open करून घ्यायचे आहे.

2) होम पेज वर आल्यानंतर ज्यांच्या कडे CSC आयडी आहे त्यांनी या ठिकाणी आयडी टाकून open करून घ्यायचे आहे. खाकी आल्यानंतर yes पर्यायावर क्लीक करायचे आहे. आता Farmer Id Card 2025 आपल्याला कार्ड काढायचे आहे आधार वेरिफिकेशन चे दोन पद्धती आहेत यामध्ये otp आणि biometric पद्धत या ठिकाणी आपण otp चा वापर करून करणार आहोत.

 या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपला जो आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक आहे या ठिकाणी otp येईल तो otp या ठिकाणी टाकायचा आहे. आणि व्हेरिफाय करून घ्यायचा आहे व्हेरिफाय झल्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे.

 आणि मेल आयडी टाकायचा आहे. टाकल्यानंतर बाहेर click करा.Farmer Id Card 2025 ज्या शेतकऱ्याचा तुम्ही आता मोबाईल नंबर टाकला आहे त्यावर एक otp येईल हा otp या ठिकाणी टाकायचा आहे.आणि व्हेरिफाय करायचं आहे.

2) मोबाईल नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर खाली फार्मर डिटेल म्हणून पर्याय येईल या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्याची सर्व माहिती म्हणजेच कॅटेगरी कोणती आहे, जेंडर काय आहे, पत्ता काय आहे. या ठिकाणी काही माहिती आधीच येईल जी आधार कार्ड वर असणार काळजीपूर्वक ही माहिती चेक करायची आहे.

जर कॅटेगरी मधे शेतकरी असेल open सोडून तर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट चा नंबर टाकावा लागणार आहे.खाली आल्यानंतर जिल्हा, तालूका,गाव हे टाकून घ्यायचे आहे. खाली लँड होल्डर मधे जर तुम्ही स्वतः असाल यामधे owner नावाचा पर्याय असेल तर हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे.Farmer Id Card 2025

3) खाली आल्यानंतर occupation Details विचारली म्हणजेच तुमचा जो व्यवसाय आहे या ठिकाणी विचारला गेला आहे. या ठिकाणी क्लीक करायचे आहे. खाली आल्यानंतर लँड डिटेल विचारली गेली आहे.या ठिकाणी जिल्हा, तालूका, आणि गाव टाकायचा आहे.

ज्या गावामध्ये शेतकऱ्याची शेती आहे त्या शेतीचा गट नंबर टाकायचा आहे. पुढे त्या गटा मधे जी काही नावे असतील त्यामध्ये शेतकऱ्याच्या नावाची निवड करायची आहे. सगळी माहिती एकदा चेक करायची आहे आणि खाली आल्यानंतर सबमिट करायचे आहे.Farmer Id Card 2025

4) पुढे आल्यानंतर verify All Land या पर्यायावर क्लीक करायचे आहे अजून काही गट नंबर या ठिकाणी शेतकऱ्यांचे असतील तर या ठिकाणी टाकून व्हेरिफाय करून घ्यायचे आहे. Farmer Id Card 2025 त्यांनातर खाली यायचे आहे या ठिकाणी department Approval या ठिकाणी Revenue सिलेक्ट करायचे आहे. खाली आल्यानंतर सर्व छोट्या चौकट आहे सर्व ठिकाणी क्लीक करायचे आहे.

सर्वात खाली आल्यानंतर save As Draft चा पार्याय येईल या ठिकाणी क्लीक करून पुढे यायचे आहे. आता पून्हा एकदा आपण शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि बाहेर क्लीक केल्यावर continue to editing हा पर्याय येईल यावर क्लीक करायचे आहे.

पार्ट तुम्ही फॉर्म मधे येताल या ठिकाणी save as Draft चा प्रॉब्लेम येतो तर या ठिकाणी तुम्ही कोणती माहिती चुकीची भरली असेल तर हा प्रॉब्लेम येतो सर्व एकदा चेक करवून घ्यायचे आहे.Farmer Id Card 2025

जास्तकारून शेतकऱ्याचे नाव जे इंग्लिश मधे असणार आहे तसेच नाव हे मराठी मधे टाकायचं आहे यामुळे हा प्रॉब्लेम जाणार आहे आता खाली आल्यानंन्तर save नावाचा पर्याय येईल सेव करा आणि otp वर क्लीक करून proceed to E-sign या पर्यायावर क्लीक करायचे आहे.

या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि otp जनरेटर करायचा आहे. शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक त्या नंबर वर otp येईल तो otp या ठिकाणी टाकायचा आहे. आणि खाली सबमिट बटनवर क्लीक करायचा आहे. आता आपलं सर्व काम झालेले आहे पुढे आपल्या समोर Ragistration Successful असा दाखवेल शेतकऱ्याची या ठिकाणी नोंदणी झलेली आहे. 

5) खाली आल्यानंतर डाउनलोड pdf असा पर्याय येईल या ठिकाणी क्लीक करून जी काही प्रिंट राहणार आहे ती शेतकऱ्यांना देऊन टाकायची आहे आता आपण या नोंदणीचा Farmer Id Card 2025 स्टेटस देखील चेक करू शकतो

शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर टाका त्यानंतर otp टाका वेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्या समोर शेतकऱ्याचा enrollment id दिसलें आणि त्या खाली Approval Workflow Status -Pending असे आपल्या समोर दिसेल काही दिवसांनी हे स्टेट्स अप्रोव्ह होईल व हे आयडी कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे.Farmer Id Card 2025

शेतकऱ्यांसाठी हा लेख अत्यंत महत्वपूर्ण होता जर ही माहिती अजूनही शेतकऱ्या पर्यंत पोहचली नसेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांना share करून Farmer Id Card बद्दल माहिती द्या धन्यवाद.

 • सतत विचारले जाणारे प्रश्न 

1) Farmer Id Card काय आहे

Farmer Id Card हे एक शेतकऱ्यांचे डिजिटल पद्धतीचे आयडी कार्ड कार्ड आहे यामध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती सुरक्षितपणे साठविली जाते. व शेती संदर्भातील माहिती योजना, या सर्वांची माहिती या मधे असते.

2) शेतकरी कार्ड का महत्वाचे आहे

शेतकरी कार्ड म्हणजेच Farmer Id Card आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना ओळखपत्र म्हणून हे सुरु केलेले आहे यामध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती असणार आहे तसेच योजना, शेतीचे साहित्य, कर्जमाफि याबद्दलची सर्व माहिती असणार आहे.

ही माहिती अत्यंत सुरक्षित आणि गोपनीय ठेवली जाणार आहे PM Kisan चा हफ्ता शेतकऱ्यांना जो येतो यापूढे आता शेतकरी कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांनाच याचा फायदा होणार आहे.

 3) शेतकरी ओळखपत्र Farmer Id Card काढण्यासाठी अर्ज कसा करावा

 Farmer Id किंवा शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी mhfr.agristack.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपला CSC आयडी आणि पासवर्ड टाकून काढू